वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी, चिंतलधाबा बिटातील घटना

0
538

वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी, चिंतलधाबा बिटातील घटना

 

पोंभुर्णा, जयदेव मडावी : पोंभुर्णा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील शेतशिवारा नजीक पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. 21आँक्टोंबर रोजी घडली. गजानन मोरे असे जखमीचे नाव आहे.

वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक ९७ वनक्षेत्र नजीक शेतात बसून गजानन मोरे हा गुरे चारत होता. झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांचेवर हल्ला करुन गंभीर जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तात्काळ पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने त्यांना तात्काळ चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. पुढील तपास वनविभाग करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here