बाबा आता माझं कौतुक कोण करणार ?

0
558

बाबा आता माझं कौतुक कोण करणार ?
🟡🔶🔴गडचिराेली🟣किरण घाटे🟣चंद्रपूरचे भूतपूर्व आमदार एकनाथजी साळवे यांचे आज शनिवार दि.१३मार्चला दुपारी १वाजुन २०मिनिटांनी दुख:द निधन झाले .गडचिराेली निवासी असलेल्या तथा वैदर्भिय जेष्ठ लेखिका कुसुम अलाम यांनी अधिवक्ता साळवे यांचे निधना बाबत(गुजरात दाै-यावरुन) वरुन शाेकसंवेदना व्यक्त करत त्यांचे विषयी आपल्या भावना त्यांनी एका अल्पश्या लेखातुन मांडल्या आहे .त्या येथे जशाच्या तश्या देत आहाे !
🔶अॅड. एकनाथ साळवे यांचेकडे तू जाऊ नको ! त्यांचेवर वाँच आहे ! असे मला कळवण्यांत आले होते .तरी मी त्यांच्या चंद्रपूरच्या घरी भेटीला गेली.मी भेटत राहिली. त्यांचे सातत्याने पत्र पाठवले जाणे संपर्कात राहणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती.शालिनीताई साळवे व एकनाथ साळवे हे मिश्रण माझ्या जीवनात एकजीव व घट्ट होत राहिले. आयुष्यात माझेवर खरे प्रेम करणारे हे माझे मायबाप अशी माझी जन्मदात्री लहीनीबाई गोविंदराव येरमे नेहमीच उल्लेख करत असते. एकदा ब्रम्हपूरीला बाबा घरी आले होते माझी भाची विजयालक्ष्मीची विचारपूस केली ती कराटे पटू आहे तिला बामणी च्या शाळेत घेऊन ये मुलींना प्रेरणा मिळेल हे आई समोर बोलले माझी आई अजुनही मला म्हणते तू विजुताईला बामणी (बल्लारशा) ला का नेत नाही साळवे वकिल साहेबांना भेटायला. बाबांनी माझ्यावर अपार प्रेम केले. खरे तर आदिवासींसाठी ते रडत, लढत राहिले. आदिवासी साठी जगत राहिले. एडका आत्राम या सामान्य माणसाच्या वेदना शब्दबद्ध केल्या. एनकाऊंटर नं दोन मधील नायिका ही कुसुम अलाम आहे हे स्वप्न माझेबद्दल बाळगले. माझा प्रेमाचा सागर आज आटला मधल्या काळात आपण म्हणालात बाबा आता जगणे नको.. मी म्हटलं असे का बोलता आम्हाला पोरकं करायचा विचार करत आहात. वय झालंय ऐकायला येत नाही, एक एक अवयव सोडून जातो आहे. म्हणत सुनबाईची तारीफ केली. किती बोललो होतो आपण ! आई पण सोबत करत होती. परत प्रत्यक्ष भेटीची आस होती पण माझी सामाजिक भटकंती मला स्थिर राहू देत नाही. आजही मी गुजरात च्या भागात आहे. आपले अंत्यदर्शन घेता येत नाही आहे. आपण अंतःकरणात कायम आहात अगदी खोल जिथे प्रेमाचा ओलावा आहे
आपला आशिर्वाद सदैव असु द्या. शेवटचा सलाम !
आपली कुसुम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here