चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती तस्करांच्या मनात भरली धडकी !
विद्युत वरखेडकर व सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाच्या कारवायां सुरुच!

एसडीआे राेहन घुगे यांनी प्राणाची पर्वा न करता भल्या पहाटे गाठले रेती घाट !
💠🟨🛑किरण घाटे💠🟨जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟩💠चंद्रपूर जिल्ह्यातील काेणत्याही रेती घाटांचे लिलाव न झाल्यामुळे अक्षरशा जिल्ह्यातील रेती तस्करांनी धुमाकुळ घातला हाेता .लाेकप्रतिनिधी साेबतच सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने वाढु लागल्या हाेत्या .दरम्यान रेती तस्करांनी ठिकठिकाणी पाळत ठेवून रेतीची अवैधरित्या तस्करी सुरु केली हाेती .🌀🟨🔶💠चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या बाबतीत लगेच जिल्ह्यातिल अधिकारी व कर्मचा-यांना अवैधरेती तस्करांवर दंडात्मक कारवाई करण्यांबाबतचे निर्देश दिले हाेते. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागिय अधिकारी राेहन घुगे यांनी स्वताच्या प्राणाची पर्वा न करता भल्या पहाटे गुरुवारी दुचाकीने हरणघाट गाठले व एक दाेन नव्हे तर चक्क २४अवैध रेती वाहने दंडात्मक कारवायांसाठी आपल्या ताब्यात घेतले .हे व्रूत्त कानी पडताच जिल्ह्यातील रेती तस्करांत एकच खळबळ उडाली हाेती .🟣🟢🟡🔶🌀🟧महसुल विभागातील काही कर्मचा-यांनी अवैध रेतीवर अंकुश लावण्यांसाठी नदी घाटावरील मुख्य रस्त्यांवर खड्डे जरी खाेदले असले तरी याच रेती तस्करांनी रेती घाटांवर जाण्यांसाठी शेत परिसरातुन नविन रस्ते शाेधल्याची बाब निदर्शनास येत आहे .🌀🟩💠🔶🔷🟡एकीकडे एसडीआे राेहन घुगे यांनी धडक कारवायां करणे सुरु ठेवले असुन दुसरी कडे अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने देखिल अवैध रेती माफियांच्या मुसक्या आवळल्याचे एकंदरीत दिसुन येते .🟡🔷🛑🟣🟢सततच्या कारवायां मुळे आता रेती माफियांच्या मनात भिती निर्माण झाली असुन काही प्रमाणात का हाेईना परंतु अवैध रेती वाहतुकीवर अंकुश बसल्याचे चित्र दूष्टीक्षेपात पडत आहे .ही माेहीम अशीच सुरु राहावी. अशी अपेक्षा देखिल जनतेतुन व्यक्त हाेत आहे .🟨🌀🔶🟣🟢मूल तालुक्यात नव्याने आलेले तहसीलदार डाँ .रविन्द्र हाेळी यांचा धाक आज ही रेती तस्करांत कायम आहे . 💠🟢🟨🟣चंद्रपूर शहरातील पठाणपुरा हे अवैध रेती तस्कारांचे प्रमुख केन्द्र असुन या कडे लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचे जनतेत बाेलल्या जात आहे येथील रेती तस्करांनी गांधी चाैकांपासून पाळत ठेवली असल्याची नागरिकांत चर्चा आहे .जिल्हा भरारी पथकांने या कडे लक्ष दिल्यास शासनास माेठ्या प्रमाणात दंड मिळु शकेल ! हे मात्र खरे आहे .🟧💠🛑🟣मध्यंतरी चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गाैंड, नायब तहसीलदार राजू धांडे व महसुल पथकाने (एकाच दिवशी) या परिसरांतुन ६वाहनांना दंडात्मक कारवायांसाठी ताब्यात घेतल्याचे सर्वश्रूतच आहे.