नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानपीकाची तात्काळ चौकशी करावी.

0
404

नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानपीकाची तात्काळ चौकशी करावी.

नागभिड तालुक्यातील शेतकरी मावा तुळतुळा या धानपीकाच्या रोगामुळे हवालदील झालेले आहेत. तालुक्यातील बहूतांश गावातील शेतकरी मावा तुळतुळा या रोगाला बळी पडलेले आहेत. हातात आलेला पीक जानार या भिती पोटी अनेकांनी हीम्मत सोडलेली आहे. धानावर हजारो रुपयाची औषधी फवारनी करुनही धानपीक हातात येनार याची कुनालाही शास्वती राहीली नाही. दर वर्षी पेक्षा या वर्षी दूप्पट, तीनपट खर्च करावा लागत असुनही पीक मीळेल हे कोनीही सांगूच शकत नाही. या वर्षीच्या पावसाळी हंगामाला अकुशल वातावरनाचा बराचसा सामना करावा लागत आहे. सोयाबीन, कापुस, कीवा धान पीक हे पीक घेनाऱ्या संपुर्न शेतकऱ्याची अवाढव्य नुकसांन झालेली आहे. मात्र त्या शेतकऱ्यांकडे कोनीही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत त्या शेतकऱ्याने पाहव तरी कुनाकडे. खास करुन घोडाझरी तलावाच्या ओलीत शेतकऱ्यावर तर आत्महतेचिच वेळ आल्यासारखी वाटायला लागली आहे. एकीकडे कोरोनाच्या लाकडाउनमुळे जनतेवर तशीही उपासमारीची वेळ आली होती. आणी आता कर्ज काढून पीकवलेली शेती जरी हातातुन गेली तर त्यांनी काय कराव. कर्ज कसं फेडायचं, मुलांच शिक्षण कस करायच, खायचं काय आनी वीकायचं काय. या महासंकटात सापडलेला शेतकरी राजा आज आत्महतेच्या दारात उभा आहे. काय कराव कुनाला मदत मागावी. हे त्याला कळेनासं झालेलं आहे. शेतकरी हवालदील झालेला आहे. काही गावतील काही शेतकऱ्यांनी हातात येईल तेवढा पीक कापुन टाकला. परंतु त्या सडलेल्या मालाचा मोबदला त्याला कोनत्या आधारावर मीळेल. त्याची चौकशी जर झालीच नाही तर त्याला काहीच मीळनार नाही. म्हनुन आधी चौकशी व्हायला पाहीजे. हे कळताच बहूजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे चीमुर विधानसभा अध्यक्ष निकेश रामटेके यांनी गावातील पटवारी कृषी अधीकारी यांना तात्काळ चौकशी करुन वरिष्ठ अधिकाऱयांना माहीती देन्यास सांगीतले. परंतु आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेश आल्याशीवाय आम्ही काहीच करु शकत नाही. अशी माहीती कृषी विभागाकडून दिली असता, चिमूर विधानसभा अध्यक्ष निकेश भाऊंनी तात्काळ मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई, कृषीमंत्री मंत्रालय मुंबई. पालकमंत्री चंद्रपुर व जील्हाधीकारी चंद्रपुर यांना तहसीलदार नागभिड यांच्या मार्फतीने निवेदने देवुन तात्काळ चौकशीचे आदेश द्यावे व शेतकऱ्यांना आर्थीक मदत तात्काळ करावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here