मोहफुलांचे लाडू बनवून महिलांचा उद्योगासाठी पुढाकार

0
564

    प्रतिकारशक्ती वाढविणारे आरोग्यवर्धक मोहफुलाचे लाडू बनविण्याचा उद्योग नोकारी येथील महिलांनी सुरू केला . वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिला समूह पुढे येत आहे.लोकांनी स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी केल्यास नक्कीच महिलांना प्रेरणा मिळेल. शासनस्तरावर सहकार्य व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.मा. राहुल कर्डीले ,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात याकरिता कार्य सुरू आहे.

जिल्हा कार्यकारी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत कोरपना तालुक्यातील नोकरी (पाल ) या गावात उन्नती स्वयंसहायता समूह नोकारी च्या माध्यमातून आरोग्यवर्धक मोहफुलाचे लाडू बनविण्याचा उद्योग सुरू केलेला आहे . महिलांचे सक्षमीकरण व्हावे व महिला आर्थिक स्वावलंबी व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून च कार्य सुरू आहे , नोकारी गावातही 12 महिलांनी एकत्र येऊन उन्नती स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना करण्यात केली . महिला सक्षमीकरनासोबत आपणही उद्योग करावा अशी कल्पना उन्नती समूहाच्या अध्यक्ष,सौ, प्रज्ञा समीर देवघरे,, सचिव सौ, मनिषा संजय चेन्नुरवार यांनी महिलांसमोर मांडली . मा. राहुल कर्डीले , मुख्य कार्यकारी अधिकारी ,जि. प. चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात हिरकणी नव उद्योजक महाराष्ट्राची ही स्पर्धा चंद्रपुर येथेही येथे घेण्यात आली . नोकारी येथील उन्नती समूहाने आरोघ्यवर्धक मोहाचे लाडू उद्योग ही नाविन्यपूर्ण कल्पना मांडून तालुका स्तरावर 50000 व जिल्हा स्तरावर 2,00,000 रुपयांचे पारितोषिक पटकावले आणि आरोघ्यवर्धक मोहाचे लाडू हा उद्योग साकारला . यशस्वी उद्योगासाठी पॅकिंग , मार्केटिंग , मालाची गुणवत्ता , आर्थिक व्यवहाराची नोंद आणि समूहातील महिलांची एकजूट आवश्यक असते याबाबत विद्या पाल – गजभिये जिल्हा कार्यकारी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान यांनी गावात प्रत्यक्षपणे महिलांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here