राज्य शासनाने तहसीलदार पदांच्या रिक्त जागा भरल्या…

363

राज्य शासनाने तहसीलदार पदांच्या रिक्त जागा भरल्या…

जिवती तहसील कार्यालयाचा कार्यभार दिपक वजाळे तर बल्लारपूर तहसील कार्यालयाचा कार्यभार श्रीमती स्नेहल रहाटे स्विकारणार!

 

 

चंद्रपूर/प्रतिनिधी : राज्य शासनाने गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील रिक्त असलेल्या तहसीलदार पदांच्या जागा भरल्या असून अतिदुर्गम भागातील जिवती तहसील कार्यालयाचा कार्यभार दिपक वजाळे हे स्विकारणार आहे तर ओद्यौगिक बल्लारपूर तहसील कार्यालयाचा कार्यभार श्रीमती स्नेहल दिपकराव रहाटे (परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी) सांभाळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दरम्यान जिवतीचे या पूर्विचे प्रभारी तहसीलदार प्रविण चिडे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरपना येथील तहसील कार्यालयाचा नियमित नायब तहसीलदार म्हणून कार्यभार दि. ५ मार्च २०२० ला स्विकारला होता. त्या नंतर चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे एका आदेशान्वये जिवती येथील तहसिलदार या पदाचा कार्यभार प्रविण चिडे यांनी दि. १५ जानेवारी २०२० ला स्विकारला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी जिवती मुख्याधिकारी या पदाचा देखिल कार्यभार व्यवस्थितपणे हाताळला होता. चिडे यांची ही बदली कुठल्याही लोक तक्रारींच्या आधारे झाली नसून शासनाने तहसीलदार पदाच्या रिक्त जागा भरल्यामुळे ते आपले मूळ पदावर परत गेले.

विशेष म्हणजे प्रविण चिडे हे कोरपना तहसील कार्यालयाचे नियमीत नायब तहसीलदार असून त्यांनी आज पावेतो जिवती येथील तहसील कार्यालयाचा प्रभारी तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळला होता. याच कालावधीत त्यांनी अनेक (प्रलंबित) महसुल प्रकरणे, (शेतकरी वर्गांना) पीक नुकसान अनुदान वाटप करुन जनतेचा विश्वास संपादन केला होता. कोरपना तालुक्यात आजही एक कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या महसूल विभागातील कार्यप्रणाली विषयी अनेकांनी समाधान व्यक्त केले आहेत.

advt