अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाहीची नविन कार्यकारणी घोषीत

0
634

अंबुजा सीमेंट मजदूर संघ उपरवाहीची नविन कार्यकारणी घोषीत

युनियनच्या अध्यक्ष पदी किशोर राहुड तर महासचिव पदी राजेन्द्र लोनगाडगे यांची निवड

 

अंबुजा सीमेंट ली. उपरवाही मध्ये नुकतीच अंबुजा सीमेंट मजदूर संघ, उपरवाही रजि. नं. एन. जी. पी. 5697 (संलग्न भारतीय मजदूर संघ) युनियनची स्थापना करण्यात आली. त्यात कार्यकारणी मध्ये किशोर राहुड अध्यक्ष, राजेन्द्र लोनगाडगे महासचिव, यशवंत धांडे कार्याध्यक्ष, अशोक निखाडे उपाध्यक्ष, अशोक मसाडे कोषाध्यक्ष, विनोद वडकी सहसचिव, गंगाधर सतपलवार प्रसिध्दि प्रमुख, रविन्द्र मांडवकर संघटनमंत्री तर कार्यकारणी सदस्य विनोद टोंगे, राजेश गंटावार, मनोज मोडक यांची निवड करण्यात आली.

आजच्या घडीला स्थायी व अस्थायी ठेकेदारी कामगांराचे सिमेंट कंपण्याकडुन शोषन होत आहे. या अन्यायाला वाच्या फोडण्यासाठी युनियनच्या माध्यमातुन संघर्ष करण्याची खुप गरज आहे. संघर्षासाठी युनियन नेहमी तयार राहील. त्यासाठी स्थायी व अस्थायी ठेकेदारी कामगांरानी युनियन ला तन, मन, धनानी सहकार्य करावे असे आव्हान राजेन्द्र लोनगाडगे महासचिव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here