नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती व घुग्घुस बौध्द सर्कल समितीच्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी 

0
224

नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती व घुग्घुस बौध्द सर्कल समितीच्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

दि.३ जानेवारी २०२४ बुधवार रोजी नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती व घुग्घुस बौध्द सर्कल समीतीच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्धाचा प्रतिमेस फुल अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जन्मदिवसानिमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

अनिरुद्ध आवळे,माधुरीताई सुटे, दुर्गाताई पाटील,दिप्तीताई सोनटक्के, अल्काताई चूनारकर,मनोहर कवाडे, सुमित्रा गाडगे, भिमेंद्र कांबळे आणि आकाश गोरघाटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या मुलींना शिकविण्याच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली आणि सावित्रीबाई फुले बद्दल आप आपले विचार व्यक्त केले. संचालन भीमेंद्र कांबळे, सुजित सोनटक्के यांनी केले. आभार प्रदर्शन आकाश गोरघाटे यांनी केले.

यावेळी नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समीतीचे अशोक रामटेके,बबलु सातपुते,शाम कुम्मरवार, अनिरुद्ध आवळे, अमित बोरकर,भिमेंद्र कांबळे,सुजित सोनटक्के, आनंद निखाडे, आशुतोष मजगवळी,भारत साळवे,शिंदे साहेब,मनोहर कवाड़े,बाबा आमटे,अमृत सौदारी, दिपक तंबाके,सविता मंडपे, माया सांड्रावार, सुप्रिया गाडगे,योगिता मुन,दिप्ती सोनटक्के, प्रांजली मुन, माया धोटे, रेखा निमसटकार, तंबाकेताई, धीरज ढोके,सचिन वैरागडे, सुमेध पाटील व सर्कल बौध्द समितीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here