स्वप्नील बांदोडकर च्या ‘राधा ही बावरी’ ने श्रोते झाले मंत्रमुग्ध!

180

स्वप्नील बांदोडकर च्या ‘राधा ही बावरी’ ने श्रोते झाले मंत्रमुग्ध!

सांस्कृतिक विभागाकडून ‘दिवाळी पहाट’ ची नागपूरकराना मेजवानी

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

 

 

नागपूर : ‘राधा ही बावरी’ या रसिक मनावर अधिराज्य गजविलेल्या प्रसिद्ध गाण्यातून आज स्वप्नील बांदोडकर यांनी नागपूरकर रसिकांना थिरकण्यास भाग पाडले.
महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या वतीने स्थानिक वंजारी नगर मैदानावर आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि सूर नवा ध्यास नवा ची विजेती सन्मित्रा शिंदे यांनी एकाहून एक सरस गीते सदर करुन नागपूरकर रसिकांचा दिवाळी चा आनंद द्विगुणित केला.

पहाटे साडेसहा वाजता सूर निरागस हो या कट्यार मधील सुमधूर गीताने सुरू झालेली संगित मैफल हळू हळू रंगत गेली. अबीर गुलाल उधळीत रंग या सन्मित्रा ने गयिलेल्या अभंगांने वातावरण भक्तिमय झाले. हिन्दी, मराठी गाण्यांची ही संगितमय सकाळ ‘गालावर खळी..’ ने स्वप्नील ने रोमँटिक केली. स्व मोहम्मद रफी यांच्या “आजा आजा मैं हूँ प्यार तेरा”, “बदन पे सितारे” या गाण्यांनी अक्षरशः मैदान नाचायला लागलं. गोंधळ, भारूड, लावणी आणि देशभक्ती चा साज चढलेली ही मैफल अडीच तास चालली आणि रसिकांना आनंद देऊन गेली.

प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कलाकारांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आभासी पद्धतीने उपस्थिती दर्शवून उपस्थितांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील जनतेला दिवाळी निमित्त ही खास सांस्कृतिक मेजवानी असून सर्वांच्या चेहऱ्यावर सतत आनंद आणि समाधान असावं अशी सदिच्छा व्यक्त केली.

दक्षिण नागपूर मतदार संघाचे आमदार श्री मोहन मते, सम्रुद्धि बँकेचे उपाध्यक्ष दिलीप लीमसे , सी. ए. माधव विचोरे, दक्षिण नागपूर भाजपा अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. रितेश जाने यांनी निवेदन केले.

सुरभी ढोमणे यांची दीप संध्या रंगली 

वंजारी नगर येथील मैदानावर शनिवारी रात्री सुरभी ढोमणे आणि सचिन ढोमणे यांच्या दीपसंध्या या कार्यक्रमासदेखील उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठी, हिन्दी गीतांची मेजवानी सांस्कृतिक विभागाने दिल्याचा आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता , ही दिवाळी संगीतमय केल्याबद्दल अनेक रसिकांनी सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

advt