उपरवाही येथील कुपोषित बालकाला पोषण आहार किट वितरित
प्रतिनिधी प्रविण मेश्राम

पाथ फाऊंडेशन व डॉ. गिरिधर काळे सामजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जाणिव माणुसकी उपक्रमाला तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान उपरवाही
गावातील दिनेश काळे यांनी घेतली जाणिव माणुसकी अभियाना अंतर्गत जबाबदारी
कोरपना तालुक्यात ६० कुपोषित बालक असल्याची शासकीय माहिती आहे. त्यानुसार जाणिव माणुसकीची अभियाना अंतर्गत तालुक्यातील कुपोषित बालकांना लोकसहभागातून पोषण आहार किट्स वितरण करण्यात येत आहे. दरम्यान , उपरवाही येथे एक बालक कुपोषित असून त्याच गावातील सजग नागरिक दिनेश काळे यांनी या मुलाला दोन महिन्यांचा पोषण आहार किट या अभियानात दिली. या प्रसंगी अंगणवाडी सेविका मनीषा निखाडे, पाथ फाऊंडेशचे दीपक चटप उपस्थित होते.