पेपरमिलच्या बांबू डेपोला लागलेल्या आगीची चौकशी करून पेपरमिल प्रशासनावर कारवाही करा – आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी

0
564

पेपरमिलच्या बांबू डेपोला लागलेल्या आगीची चौकशी करून पेपरमिल प्रशासनावर कारवाही करा – आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी

 

 

 

आज सकाळच्या सुमारास पेपरमिलच्या कळमना येथील बांबू डेपोला लागलेली आग वेळेत नियंत्रणात आणण्यात पेपर मील येथील व्यवस्थापनाला अपयश आले. येथे अश्या परिस्थितीशी निपटण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती, परिणामी आग पसरली. यात एक पेट्रोलपंपही जळाला ही घटना पेपर मिल प्रशासनाचा बेसावधपणा उघळ करणारी आहे. त्यामूळे या प्रकरणाची चौकशी करून पेपर मिल प्रशासनावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

 

 

पहाटे पासूनच कळमना येथील जंगलात वणवा पेटला होता. हा वणवा पेपरमिलच्या बांबू डेपो पर्यंत पोहचेल असा अंदाज होता. असे असतांनाही पेपरमिल प्रशासन बेसावध राहिले. याच वनव्यामुळे ही आग लागल्याचा आता अंदाज वर्तविल्या जात आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या गेल्या असत्या, तर सदर घटना टाळल्या जावू शकली असती. बांबू हा ज्वलनशिल आहे. त्यामुळे बांबूची साठवण करून ठेवल्या ठिकाणी फायर व्यवस्था असणे गरजेचे होती. मात्र याचाही येथे अभाव दिसून आला. परिणामी आगीवर वेळीस नियंत्रण मिळविण्यात येऊ शकले नाही. आग पसरत असतांनाही ती विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होतांना दिसले नाही. त्यामुळे आग पसरत गेली. आणि या आगीच्या तावडीत आलेला पेट्रोलपंपही जळून खाक झालं. सुदैवाने यात जीवित हानी टळली असली तरी. या आगीत मानवी वस्त्या सापडण्याचा धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळे घडलेली घटना आणि यात झालेला निष्काळजी पणाचा प्रकार गंभीर आहे. याची दखल घेत सदर प्रकणाची सखोल चौकशी करून पेपरमिल प्रशासनावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे चीचपल्ली येथिल बांबू प्रशिक्षण केंद्राला लागलेल्या आगीतही आग विझविण्याचे कोणतेही उपकरण नसल्याने आग पसरल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वारंवार घडत असलेल्या या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here