राजुरा मधील गोळी कांडला पोलीस प्रशासन संपूर्णतः दोषी – सुरज ठाकरे

0
1653

राजुरा मधील गोळी कांडला पोलीस प्रशासन संपूर्णतः दोषी – सुरज ठाकरे


राजुरा शहर व तालुका लगत तसेच थेट गडचांदूर ते कोरपना पर्यंत अवैधरीत्या कोळशाच्या तस्करीबाबत, रेती तस्करी बाबत कार्यवाही करिता गेल्या दोन वर्षांपासून पुराव्यानिशी पोलीस अधीक्षक ते पोलीस स्टेशन पर्यंत सुरज ठाकरे यांनी अनेक तक्रारी लेखी स्वरूपी देऊन देखील. त्यावर कार्यवाही न करता उलट पोलीस प्रशासनाने कोळसा तस्करांपासून हप्ते घेऊन कोळसा तस्करी करता रान मोकळे करून दिल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी पोलिसांवर लावला. मी दिलेल्या निवेदनांवर योग्यवेळी कार्यवाही केली असती तर हे गोळीकांड झाले नसते असे देखील सुरज ठाकरे यांनी सांगितले. सुरज ठाकरे यांनी अनेकदा पोलीस प्रशासन हे अवैध्य धंदेवाल्यांच्या पाठीशी असल्याचे आरोप अनेकदा पत्रकार परिषद घेवून देखील सुरज ठाकरे यांनी केले आहेत वेळोवेळी वर्तमानपत्रांनी देखील याबाबत वृत्त प्रकाशित केले. परंतु पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने अखेर सुरज ठाकरे यांचे भाकीत सत्य ठरले आहे.

कोळसा तस्करी, रेती तस्करी यांमध्ये लिप्त असलेल्या समस्त राजकीय पाठबळ असलेल्या तस्करांची यादी अनेकदा जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती व तक्रार अर्जासोबत सुरज ठाकरे यांनी दिली. परंतु त्यावर पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले व त्यातूनच काल राजुरा येथे एका निष्पाप महिलेचा जीव गेला असल्याची खंत सुरज ठाकरे यांनी व्यक्त करत स्थानिक राजकीय नेते व पोलीस प्रशासन यांच्या संगनमतातून अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असल्याने हा अनर्थ होऊ शकतो याची पूर्वकल्पना वर्षभरा आधीच पत्राद्वारे दिली होती. व यावर तस्करीमध्ये लिप्त असलेल्या लोकांची यादी देत तडीपारीच्या कारवाईची मागणी देखील केली होती. परंतु पोलीस प्रशासनाने त्यावर लक्ष न दिल्याने अखेर जो अनर्थ व्हायचा तो झालाच…

राजुरांमध्ये झालेल्या गोळी कांडा मुळे समस्त चंद्रपूर जिल्हा हादरला असून गेल्या तीन वर्षांमध्ये हा दुसरा गोळी कांड आहे अवैध धंद्याच्या वर्चस्वा करता हा गोळी कांड झाला असल्याचा दावा सुरज ठाकरे यांनी केला आहे. आताही जर पोलीस प्रशासन व अवैध धंद्यांमध्ये लिप्त असलेले राजकीय नेते यांनी यातून बोध घेतला नाही तर परत अशा घटना निश्चित होतील असा दावा सुरज ठाकरे यांनी आज केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here