दिवाळीची सुट्टी कमी करणाऱ्या आणि 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करणाऱ्या शासन निर्णयाची शिक्षक भारती चंद्रपूरने केली होळी

0
406

दिवाळीची सुट्टी कमी करणाऱ्या आणि 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करणाऱ्या शासन निर्णयाची शिक्षक भारती चंद्रपूरने केली होळी

विकास खोब्रागडे

चिमूर : (दि. 6 नोव्हेंबर) : 5 नोव्हेंबर २०२० आणि २9 ऑक्टोंबर २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयाची होळी शिक्षकभारती चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष श्री. भाष्कर बावणकर यांचे नेतृत्वात केली.
मा.आमदार कपिलजी पाटील, संस्थापक शिक्षक भारती संघटना, श्री. राजेद्र झाडे राज्य उपाध्यक्ष , श्री. संजय खेडीकर राज्य संघटक, श्री. भाऊसाहेब पत्रे विभागीय अध्यक्षभाऊराव पत्रे, श्री. सुरेश डांगे विभागीय सरचिटणीस नेतृत्वाने दिलेल्या आव्हानाला साथ देत, चंद्रपूर जिल्हा शिक्षक भारतीने शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या निर्णयाची होळी केली.
या प्रसंगी भाष्कर बावणकर जिल्हाध्यक्ष, किशोर हजारे जिल्हा मार्गदर्शक, मोहन दोडके, पुरूषोत्तम गायकवाड, माधव पिसे, प्रविण घ्यार सोबत मोठया प्रमाणात शिक्षकवृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here