यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्रमिक कार्ड चे वितरण

0
851

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने श्रमिक कार्ड चे वितरण

 

 

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आज शुक्रवारी श्रमिक कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोनशे पन्नास नागरिकांना श्रमिक कार्डचे वितरण करण्यात आले. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर सेवक पप्पू देशमूख, धम्मचक्र स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष तथा मनपा नगर सेवक स्नेहल रामटेके यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर युवा अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शिक्षण विभागाचे शहराध्यक्ष प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे युवा अध्यक्ष राशेद हुसेन, सायली येरणे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. कामगार वर्गासाठी श्रमिक कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर योजनेबाबत नागरिकांना पूरेपूर माहिती नसल्याने पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहे. तसेच काही एजंट सदर कार्ड बनविण्यासाठी नागरिकांकडून अवाढव्य रक्कम वसूलत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्रमिक कार्ड मोफत बनवून देण्याची मोहिम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु करण्यात आली होती. जवळपास महिणाभर चाललेल्या या मोहिमेचा शहरातील नोंदणीकृत ईमारत बांधकाम कामगार, घरकाम करणा-या महिला, फुटपाथ वरील विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ऑटो चालक, वृत्तपत्रे विक्रेते, पशूपालन कामगार, शिलाई मशिन कामगार, सुतार काम करणारी व्यक्ती, शेत काम करणारी व्यक्ती, आशा सेविका व अंगणवाडी सेविका, मिठ कामगार, न्हावी कामगार, ब्युटी पार्लर कामगार महिला, पेंटर इलेक्ट्रीशियन व प्लंबर कामगारांसह इतर कामगारांनी हजारोच्या संख्येने लाभ घेतला. या सर्व पात्र लाभार्थ्यांना आज यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात श्रमिक कार्ड चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलतांना नगर सेवक पप्पू देशमूख म्हणाले कि, आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेड ही संघटना सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद काम आहे. या संघटनेच्या माध्यमातून गरिब गरजूंना मदत केल्या जात आहे. श्रमिक कार्ड हा उपक्रम सुध्दा समाजातील कामगार वर्गासाठी उपयोगी असून हे श्रमिक कार्ड भविष्यात कामगारांसाठी मोठा आधार ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेड ही संघटना सामजिक कार्यासह अन्याया विरोधातही वारंवार रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मनपातील भष्ट्राचारा विरोधातील लढ्यात या संघटनेने पूढाकार घेत नागरिकांचे प्रश्न सुटावेत या करिता अनेक आंदोलने केली आहे. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन संघटनेच्या सुरु असलेल्या लढ्याला जनतेनेही समर्थन देत त्यात सहभाग घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे घूग्घूस शहर संघटक विलास वनकर, करणसिंह बैस, कौसर खान, माधूरी निवलकर, पौर्णिमा बावने, गौरव जोरगेवार, राम जंगम, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन कल्पना शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक शिवणकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here