पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा

0
420

पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा

 

कोरपना – कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार के. के. श्रीवास्तव उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अशोक डोईफोडे, कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, रफिक शेख, उद्धव पुरी, मारोती चापले, गणेश लोंढे, उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे, अतुल गोरे, मयुर एकरे, नितेश शेंडे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी पत्रकार संघाच्या वतीने सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीकरिता अनेक पत्रकार बांधवांनी आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन मयुर एकरे यांनी केले. प्रास्ताविक उद्धव पुरी यांनी केले तर आभार गणेश लोंढे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here