छत्रपती शिवजी महाराज जय घोषाने गडचांदुरात सामाजिक बांधिकी जोपासत विविध उपक्रम

0
524

छत्रपती शिवजी महाराज जय घोषाने गडचांदुरात सामाजिक बांधिकी जोपासत विविध उपक्रम

व्ही कॅन फाऊंडेशन संस्थेचा पुढाकार

गडचांदूर/प्रतिनिधी । महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वी कॅन फाउंडेशन गडचांदूरच्या वतीने भव्य रक्तदान,रुग्णालयात फळ वाटप,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यकीट वाटप अश्या अनेक सामाजिक उपक्रम राबवून शिव जयंती साजरी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे आहे की गडचांदूर शहरात समाजाला काही देणं लागत ह्या उद्देशातून सामाजिक उपक्रम राबविणार व्ही कॅन फाऊंडेशन संस्थेच्या वतीने गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये हा उद्देश समोर ठेऊन सामाजिक बांधीलकी जोपासत कोरोना रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेत शासकीय रक्तपेढीत सहकार्य व्हावे या उद्देशाने रक्दान शिबिराचे आयोजन करण्यात आले , तसेच गरुजू विद्यार्थांना 50 शालेय किट , व ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रुग्णाना फळ वितरण उपक्रमाचे आयोजन करून विवीध सामाजिक उपक्रमातून शिव जयंती साजरी करण्यात आली .

रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या शुभहस्ते करण्यात आले , तसेच वाइल्ड लाइफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन( वी कैन फाउंडेशन ) वेबसाइटचे उद्घाटन उपनगराध्यक्षा शरद जोगी यांच्या शुभहस्ते पार पडले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्थानी मुख्याधिकारी विशाखा शेळकी होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय रक्त पिढीचे डॉ.पंकज पवार ,मनोज भोजेकर, विक्रम येरने, किरण अहिरकर,जयश्री ताकसांडे,अरविंद मेश्राम,राहुल उमरे,सविता वाढरे,पापयाजी पोंनमवार,कल्पना निमजे,अरविंद डोहे, रामभाऊ मोरे,मीनाक्षी एकरे, अश्विनी कांबळे,वैशाली गोरे,कोडपे मॅडम, निलेश ताजने,सतीश उपलचीवार, संतोष महाडोळे, डॉ.प्रवीण लोनगाडगे,पुरुषोत्तम निब्रड,डॉ. चांदेकर, आकाश राठोड , वनविभाग कर्मचारी,पोलिस कर्मचारी , यांची प्रमुख पाहुने म्हणून उपस्थिति होती. वी कॅन फाउंडेशनच्या कार्याचे सर्वांनी कोतुक केले, रक्तदान करण्याऱ्या डोनरला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले , कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वी कॅन फाऊंडेशन च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here