ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांना अभिवादन

97

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांना अभिवादन

संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेची शिकवण भारताला आधुनिकतेकडे नेणारी – विवेक बोढे

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात गुरुवार, २३ फेब्रुवारीला वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

यावेळी बोलतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज कोणत्याही गावात सकाळी पाऊल टाकताच आधी आपल्या हातातील झाडूने गावात स्वच्छता करायचे नंतर सायंकाळी कीर्तनाने प्रबोधन करायचे. संत गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक सर्वकाही विसरून गर्दी करायचे. असे संत गाडगे महाराजांचे जीवनाचे व सेवेचे कार्य होते.

संत गाडगे महाराजांनी स्वच्छता व कीर्तनाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती समाजात घडविली. दररोज सकाळ होताच संत गाडगे महाराजांच्या हातात खराटा असायचा खराटा घेऊन गावाची स्वच्छता करणे, परिसराची स्वच्छता करणे, आणि रात्री आपल्या कीर्तनातून जनजागृती करणे हा महाराजांचा दिनक्रम होता त्यांनी स्वच्छतेची शिकवण देऊन देहश्रमाची पराकाष्ठा केली.

कर्मयोगी संत गाडगे महाराजांच्या १४७ व्या जयंती महोत्सवानिमित्त धोबी परीट जनकल्याण संस्था घुग्घुसतर्फे शहरातून ग्राम स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रा जवळ रॅलीचे आगमन होताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी धोबी परीट समाज बांधवांचे स्वागत केली. तसेच धोबी परीट समाज बांधवांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांना अभिवादन केले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे सिनू इसारप, संजय भोंगळे, विवेक तिवारी, शाम आगदारी, धोबी परीट समाजाचे सचिन क्षीरसागर, विलास भोस्कर, निलेश मुक्के, बाबाराव बोबडे, रामूजी भसारकर, शेखर तंगल्लापेल्ली, बंटी भोस्कर, चंदन तुराणकर, विजया बंडेवार, गीता क्षीरसागर, शीतल क्षीरसागर, रंजना भोस्कर, वंदना क्षीरसागर, मीनाक्षी दाढे, कल्पना तुराणकर व मोठया संख्येत समाज बांधव उपस्थित होते.

advt