ओबीसी संवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याला विरोध.
– राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी.
– मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नये.
राजुरा 28 सप्टेंबर
नुकतीच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून अनेक मराठा संघटना मराठा समाजाचा समावेश ओबीसी संवर्गात करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नये यांकरीता राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी ,अधिकारी महासंघ राजुरा च्या वतीने तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार ,इतर मागास बहुजन कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविण्यात आले.
महाराष्ट्रातील ओबीसी जागेचा ब्यक्लॉक अजुनपर्यंत महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेला नाही. तसेच 18 जून 1994 च्या परीपत्रकानुसार ओबीसीचे 19% असलेले आरक्षण महाराष्ट्रातिल अनेक जिल्ह्यांना मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या जिल्ह्यातिल आरक्षणातिल विसंगती दिसून येत आहे.ही विसंगती त्वरित दूर करण्यात यावी , सर्वांची जातीनीहाय जनगणना करावी आणि मराठा समाजाला ओबीसी संवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये अश्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर , कार्याध्यक्ष कपिल इद्दे ,महासचिव बादल बेले, समन्वयक संदीप आदे, नितीन पीपरे , निखिल बोंडे , विनायक काळे ,नागेश उरकुडे ,सुधाकर रासेकर ,पुंडलिक वाढई , प्रकाश ठावरी , नितीन जयपूरकर , छोटूलाल सोमलकर आदिँचि निवेदन देतेवेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.