पाटागुडा येथिल गावाच्या बाहेरिल सभागृहातील वाचणालय चे काम तातडीने रद्द करुन गावातील सभागृहात वाचणालय सुरू करा

0
567

पाटागुडा येथिल गावाच्या बाहेरिल सभागृहातील वाचणालय चे काम तातडीने रद्द करुन गावातील सभागृहात वाचणालय सुरू करा

प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांची मुख्यधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल

जिवती : जिल्हा परिषद चंद्रपूर अर्तंगत सन २०१९-२०२० मध्ये मौजा पाटागुडासाठी ३ लाख रुपये निधी वाचणालय साठी मंजूर करण्यात आली आहे, या कामाची प्रत्यक्ष कामास जेव्हा सुरुवात करण्यात आली त्यावेळी असे निदर्शनास आले कि या कामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस काम होतं आहे, ग्रामस्थ यांची फसवणूक करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामातुन उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. “चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा गावात ग्रंथालयाच काम अतिशय निकृष्ट दर्जाच झालं आहे. विकासकमाला विरोध नाही. मात्र निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची. गावविकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे”.
तसेच गावातील एक सभागृह असतांना सुध्दा गावातील सभागृहात वाचणालय सुरू न करता ग्राम पंचायत चिखली खुर्द यांनी आपल्या मन मानी कारभार करुन गावा पासून २०० मिटर अंतरावर एका सभागृहात वाचणालय सुरू करण्याचा निर्णय घेऊन काम सुरू केले आहे.
पण खरच या गावाच्या बाहेरिल वाचणालयात सायंकाळ च्या वेळेत लहान लहान मुले जाऊ शकत नाही यामुळे जे गावातील सभागृह आहे यामध्ये वाचणालय सुरू करा अशी विनंती प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांनी मा.मुख्यधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा अधिकारी जिल्हा चंद्रपूर, गट विकास अधिकारी जिवती यांच्या कडे ई-मेल द्वारा तक्रार दाखल केली आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here