“रुग्ण हक्क आंदोलन” सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम प्रीतम कसबे यांनी मनोरुग्णाला केले कपडे दान

0
524

“रुग्ण हक्क आंदोलन” सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम

प्रीतम कसबे यांनी मनोरुग्णाला केले कपडे दान

AnandRao
“रुग्ण हक्क आंदोलन” सामाजिक संस्था (महाराष्ट्र राज्य) पुणे शहर, संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी नागरीकांना व दानशुरांना केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. खराडी येथील प्रितम कसबे यांनी मनोरुग्ण यांना आपले कपडे दान करुन सहकार्य केले. यावेळी दादासाहेब यांच्या या कार्याचे अभिनंदन करून कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार लेखक श्रीधर जाधव यांनी काढले.
गेल्या अनेक वर्षांपासून सदर संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनहितार्थ कार्य करण्यात येत आहे. ज्या रुग्णांना धर्मादाय आयुक्त कार्यालय अंतर्गत खाजगी रुग्णालयात जास्त बिल दिले जाते ते कमी करवून घेणे, भरती करण्यास नकार देत असल्यास त्या रुग्णांना रुग्णालयात भरती करणे, मृत्यू झालेल्या रुग्णांना खर्च न देता त्यांचे शव कुटुंबियांच्या स्वाधीन करून देणे यासारखी बरीच कामे सदर संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत.
फुटपाथ, रस्त्याच्या कडेला नग्न, अर्धनग्न असलेल्या मनोरुग्णांना आपलंसं करून त्यांचे केस, दाढी कापणे, स्वच्छ अंघोळ करून ससून रुग्णालयात उपचार करण्यात येतो. मानसिक स्थिती पूर्ववत झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांच्या सुपूर्द करण्याचे अनमोल, स्तुत्य कार्य सदर संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते. शिवाय तळागाळातील गोरगरिब जनतेपर्यंत पोहचून त्यांची सेवा करण्याचे कार्य दादासाहेब गायकवाड रुग्ण हक्क आंदोलन या सामाजिक संस्थेतर्फे करत आहेत.
आपण ही आम्हाला आपले नविन , जुने कपडे साडी, ड्रेस देऊन सहकार्य करा. तुम्हाला आपल्या भागात किंवा इतरत्र कोणी बेवारस मनोरुग्ण दिसला तर आम्हाला कळवा आम्ही त्याला ताब्यात घेवून हॉस्पिटलमध्ये भरती करु. तसेच आपण दिलेले कपडे त्याला घालून तो निट झाल्यावर त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी मदत करु. असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here