छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न

0
460

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न 

चेक आष्टा ग्रामपंचायत ने स्वराज्य गुढी उभारली.

प्रतिनिधी :- जयदेव मडावी

शिवशके राजदंड स्वराज्य गुढी संहिता दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक शिवस्वराज्य दिन चेक आष्टा ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छोट्या जहागीरीचे स्वराज्यात रुपांतर केले. बलाढ्य फौज जमविली, राज्य कारभार यंत्रणा उभारली. म्हणून आज च्या दिवशी राजदंड स्वराज्य संहिता दिवस गुढी उभारून स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. चेक आष्टा ग्रामपंचायत मध्ये सरपंच- सौ.कांताताई फुलचंद मडावी, उपसरपंच -श्री.जगनाथ तुळशिराम येलके, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य -जयंत पिंपडशेंडे, विद्यमान सदस्य- जिवनदास कुंभरे, सरिता मरस्कोल्हे,मिनाक्षी येलके,लिलाताई बोडेकार, महात्मा गांधी तंटामुक्त समिती सदस्यगण ,कर्मचारी आदिंच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here