जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

0
586

तालुका प्रतिनिधी✍🏻पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ/झरी जामनी :-

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी तालुक्यातील आडकोली ग्रामपंचायत येथे महिला तालुका अध्यक्ष(भाजपा)प्रिया भोयर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बंडू जुमनाके (सरपंच), ग्रामपंचायत सदस्य,कृषिमित्र निलेश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व उपस्थित प्रमुखांच्या हस्ते विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष भोयर यांनी आणि उपस्थितांनी मागील तीन वर्षांपासून लागवड करत आलेल्या आडकोली, खडकडोह परिसरातील घनदाट वृक्षलागवडीतील भरघोस वाढ झालेल्या वृक्षवाटिकेची पाहणी केली, तसेच त्यांनी आडकोली येथील लागवड केलेल्या व सध्या असलेल्या वनक्षेत्राची माहिती घेऊन तेथील वनराई अधिक बहरावी यादृष्टीने सूचना केल्या. या कार्यक्रमास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट, कृषी मित्र कृषी सहाय्यक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here