impact 24 news बातमीची दखल घेत अखेर पाणपोईचा पाणी पुरवठा तात्काळ सुरु

0
475

impact 24 news बातमीची दखल घेत अखेर पाणपोईचा पाणी पुरवठा तात्काळ सुरु

IMPACT चा impact

नांदाफाटा : अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून नांदाफाटा चौकात पिंपळगाव रोडवर थंड पिण्याचे पाण्याची पाणपोई मागील वर्षी सुरू करण्यात आली होती. मागील दोन महिन्यांपासून ही पाणपोई बंद असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास होत होता. येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांकडे अनेकदा नागरिकांनी पाणपोई सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु पाणपोईचा पाणीपुरवठा कंपनीकडून बंद होता. impact24news ने अल्ट्राटेक कंपनीकडून सुरू केलेली पाणपोई बनली शोभेची वस्तू असे वृत्त प्रसारित करत संबंधित विभागाचे याकडे लक्ष वेधले.

अल्ट्राटेक कंपनीकडून सुरू केलेली पाणपोई बनली शोभेची वस्तू

सदर वृत्ताची कंपनी प्रशासनाने या वृत्ताची तात्काळ दखल घेऊन दुसर्‍याच दिवशी तात्काळ पाण्याचा पुरवठा सुरू केल्याने नागरिकांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. तातडीने पाणी सुरू केल्याने नागरिकांनी अल्ट्राटेक कंपनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here