अल्ट्राटेक कंपनीकडून सुरू केलेली पाणपोई बनली शोभेची वस्तू

0
558

अल्ट्राटेक कंपनीकडून सुरू केलेली पाणपोई बनली शोभेची वस्तू

मागील दोन महिन्यांपासून पाण्याचा पुरवठा बंद

 

नांदाफाटा : अल्ट्राटेक कंपनी कडून मोठ्या थाटात सुरु करण्यात आलेली थंड पाण्याची पाणपोई मागील दोन महिन्यांपासून बंद पडून असून कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याची व बसण्याकरिता आच्छादन टाकण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर करण्याचे निर्देश दिले आहे.

असे असतांना येथील थंड पिण्याचे पाण्याची पाणपोई बंद पडून आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यानी व नागरिकांनी पाणपोई सुरू करण्याकरिता कंपनीला विनंती केली असुन अल्ट्राटेक कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती नागरिकांनी सुद्धा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here