सहजं सुचलंच्या महिलांचे कला, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय : प्रज्ञा भगत

0
465

सहजं सुचलंच्या महिलांचे कला, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय : प्रज्ञा भगत

चंद्रपूर, किरण घाटे । चंद्रपूर गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातील सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील महिलांचे कार्य उल्लेखनिय व वाखाणण्याजाेगे असल्याची प्रतिक्रिया सदैव सामाजिक कार्यात अग्रकमी असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या जाधववाडीच्या प्रज्ञा भगत यांनी काल (गुरुवारी) व्यक्त केली. प्रज्ञा भगत या भारतीय छात्र संसद सदस्या आहे. सहजं सुचलं व्यासपीठासाठी अँड. मेघा धाेटे राजूरा, मायाताई काेसरे नागपूर तथा प्रभा अगडे यांचे योगदान माेलाचे असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या.
विशेषतः सामाजिक क्षेत्रात वंदना हातगांवकर, श्रुति कांबळे, साहित्य क्षेत्रात विजया भांगे, स्मिता बांडगे, विजया तत्वादी, अर्जुमन शेख, प्रतिमा नंदेश्वर, मंजुषा दरवरे, कला क्षेत्रात पुरस्कार प्राप्त कल्याणी सराेदे, मनीषा मडावी, श्रध्दा हिवरे तर क्रीड़ा क्षेत्रात सायली टाेपकर यांची कामगिरी विशेष उल्लेखनिय असल्याचे मत प्रज्ञा भगत यांनी आपल्या बाेलण्यातुन व्यक्त केले.
सहजं सुचलं व्यासपीठ महिलांच्या विविध गुणांना वाव देणारं एक उत्तम व्यासपीठ असल्याच्या शेवटी त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here