अंगावर वीज पडून चार महिलांचा जागीच मृत्यु

0
950

अंगावर वीज पडून चार महिलांचा जागीच मृत्यु

चार महिला मरण पावल्याने वायगाव परिसरात खळबळ उडाली

वरोरा : स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या वायगाव (भोयर) येथे आज चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महीलावर वीज पडून मरण पावल्याची दुःखद घटना घडली.

आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजता वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोरदार मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट सुरू झाला. यात शेतात काम करीत असताना अचानक वातावरण बदलल्याने घराकडे निघालेल्या महिलांवर विज पडली. यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.

मृत महिला हिरावती शालिक झाडे, वय ४५ वर्ष राहणार वायगाव (भोयर), माजी पंचायत समिती वरोरा सदस्य पार्वता रमेश झाडे वय ६० वर्ष राहणार वायगाव, मधुमती सुरेश झाडे वय २० वर्ष राहणार वायगाव, रीना नामदेव गजभे वय वर्ष २० राहणार वायगाव भोयर. अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर यात दोन महिला, दोन मुलींचा समावेश आहे. गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी केली आहे. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिली असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा पी एस आय प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here