घुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून उत्साहात चिकित्सक शिबीर संपन्न

166

घुग्घुस शहरात लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून उत्साहात चिकित्सक शिबीर संपन्न

लॉयड्स मेटल्सच्या नि:शुल्क रोगनिदान शिबिरात शेकडो नागरिकांची तपासणी

घुग्घूस : लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड या उद्योगामार्फत ३० जानेवारी रोजी घुग्घूस येथे नि:शुल्क रोगनिदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात परिसरातील जवळपास ८०० नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. नगरपालिकेसमोरील बालाजी सभागृहात आयोजित शिबिरात नागपूरच्या मेडीट्रीना इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली.

लॉयड्स तर्फे आयोजित या शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. जितेंद्र गादेवार उपस्थित होते. यावेळी लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड संजय कुमार, उपाध्यक्ष पवन मेश्राम, व्यवस्थापक तरूण केशवानी, रतन मेडा यांची उपस्थिती होती. हे शिबिर सोमवारी सकाळी १० ते ४ या कालावधीत घेण्यात आले. लॉयड्स मेटल्सतर्फे घुग्घूस परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, त्या अंतर्गत या रोगनिदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. भविष्यातही अशाप्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याचे युनिट हेड संजय कुमार यांनी यावेळी सांगितले. तर प्रमुख अतिथी मुख्याधिकारी गादेवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

advt