युवकांनी स्‍वतःमध्‍ये सकारात्‍मक बदल करत भारतमातेची सेवा करावी –आ. सुधीर मुनगंटीवार

0
535

युवकांनी स्‍वतःमध्‍ये सकारात्‍मक बदल करत भारतमातेची सेवा करावी –आ. सुधीर मुनगंटीवार
🟣🟩💠चंद्रपूर 🟣🟡🔶किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 🟣🔶🟡💠🟢🟥
युवक कसा असावा याचे नेमके चिंतन युगपुरुष स्‍वामी विवेकानंदांनी मांडले आहे. युवक युधिष्‍ठीरासारखा सत्‍यवान, वशिष्‍ठांसारखा ज्ञानी आणि कर्णासारखा दानी असावा असे स्‍वामीजी म्‍हणतात. भारताचे चित्र बदलायचे असेल, भारताला प्रगतीपथावर न्‍यायचे असेल तर युवकांनी स्‍वतःला बदलण्‍याची आवश्‍यकता आहे. भारताचा युवक हा पराक्रमी आहे मात्र त्‍यांना त्‍यांच्‍या पराक्रमाची जाणीव नाही. युवकांनी स्‍वतःमध्‍ये सकारात्‍मक बदल करत, उत्‍तम संकल्‍प करत भारतमातेची सेवा करावी असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

🟡🟣मंगळवार दि. २६ जानेवारीला (प्रजासत्‍ताक दिनी )चंद्रपूर शहरातील पठाणपुरा मार्गावरील भगतसिंह चौकात शहीद भगतसिंह मित्र मंडळाद्वारे आयोजित भारतमाता पूजन कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.🟡🌀💠🔶🟥 यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश इंगोले, शहीद भगतसिंह मित्र मंडळाचे सुयश खटी, कपिश उसगांवकर, प्रसाद घरोटे, प्रसाद काटपाताळ, श्रेयस घरोटे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

🔶🟡🟪💠🟥🌀सदरहु कार्यक्रमात बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, गणतंत्र दिनी उर्वरीत ३६४ दिवस आम्‍ही काय केले पाहिजे याचे चिंतन  करणे आवश्‍यक आहे. २६ जानेवारी, १५ ऑगस्‍ट या दिनविशेषांना केवळ राष्‍ट्रभक्‍तीचे प्रदर्शन करुन चालणार नाही तर हा देश बलवान व्‍हावा, लोकशाही सुदृढ व्‍हावी या दृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याची आवश्‍यकता आहे. 🟥🟩💠🔶🌀🟣२०२२ मध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होतील तेव्‍हा माझे योगदान काय असेल याचा विचार युवकांनी करण्‍याची आवश्‍यकता आहे. 💠🟢🔶🌀🟥🟣आमचे आदर्श तैमुरलंग, नादीरशाहा नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्‍मीबाई, महाराणा प्रताप हे आमचे आदर्श आहेत. 🟣🔶💠🟢🟡🟩हनुमानाला जशी आपल्‍या पराक्रमाची कल्‍पना नव्‍हती तशी अवस्‍था आज भारतीय युवकांची झाली आहे. भारतीय युवकांचा बाणा पराक्रमी आहे मात्र आपल्‍या पराक्रमाची जाणीव त्‍यांना नाही. 🔶🟪💠🟢🟩🟡मतदाना सारख्‍या पवित्र कार्यासंदर्भात सुध्‍दा युवकांची अनास्‍था आपण बघतो. हे चित्र बदलण्‍याची आवश्‍यकता आहे. 🟡🌀🟩🔶🟣मी मतदान नक्‍की करेन हा संकल्‍प युवकांनी करण्‍याची आवश्‍यकता आ. मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केले .कार्यक्रमाचे आरंभी आ. सुधीर मुनगंटीवार, प्राचार्य डॉ. राजेश इंगोले यांनी व मान्‍यवरांनी भारतमाता पूजन केले.
🟩🟡🟣🌀💠कार्यक्रमाला भगतसिंग चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी व जयविदर्भ गणेश मंडळाचे कार्यकर्ते, प्रभागातील ज्‍येष्‍ठ नागरिक, युवकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here