चंद्रपूरात घरांवर काळे झेंडे लावून केला केंद्र सरकारचा निषेध !

0
630

चंद्रपूरात घरांवर काळे झेंडे लावून केला केंद्र सरकारचा निषेध !
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आज सहा महिण्यांचा कालावधी पूर्ण ! चंद्रपूर विदर्भ किरण घाटे –
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज बुधवार दि. २६ मे ला ६ महिण्यांचा कालावधी पूर्ण झाला असून मोदी सरकार शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करीत नाही . शेतकरी विरोधी कायदे रद्द न करता स्वतःची मनमानी शेतकऱ्यांवर लादत आहे. त्याच बरोबर आज मोदी सरकारला भारत देशात सत्तेत येऊन सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे याच दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर (आजच्या दिनी )शेतकरी बांधवानी आणि प्रहारच्या सैनिकांनी आप आपल्या घरांवर काळे झेंडे लावून या हिटलरी मनोवृत्तीचा निषेध करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना .बच्चू कडु यांनी केले असता चंद्रपूर शहरातील प्रहार सेवक महेश हजारे व त्यांचे पक्षाच्या इत्तर कार्यकर्त्यांनी आज घरांवर काळे झेंडे लाऊन केंद्र सरकारच्या या हुकुमशाही धोरणाचा निषेध नाेंदविला आहे .दरम्यान दिल्लीत सुरु असलेल्या व आंदाेलनात सहभागी झालेल्या शेतकरी वर्गांनी आज काळा दिवस पाळल्याचे व्रूत्त आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here