अड्याळ येथील कोट्यावधी रुपयांच्या धानाच्या नासाडीला जबाबदार आर. एम. व एस. आर. एम. यांना तात्काळ निलंबित करा – आमदार डॉक्टर देवरावजी होळी

0
396

अड्याळ येथील कोट्यावधी रुपयांच्या धानाच्या नासाडीला जबाबदार आर. एम. व एस. आर. एम. यांना तात्काळ निलंबित करा – आमदार डॉक्टर देवरावजी होळी

आदिवासी विकास मंडळाच्या या केंद्रावर मागील वर्षीपासून धानाची उचल न केल्याने कोट्यावधी रुपयांच्या धान्याची नासाडी

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस

धानाची तात्काळ उचल करण्याची आमदार डॉ देवरावजी होळी यांची मागणी

चामोर्शी, सुखसागर झाडे:- चामोर्शी तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या अड्याळ येथील धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल मागील वर्षीपासून न केल्याने कोट्यावधी रुपयांचे धान खराब झालेले आहे. या धानाच्या नासाडीला सर्वस्वी आर. एम. व एस. आर. एम. जबाबदार असून त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रसंगी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली असता केली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली.मागील वर्षीपासून या केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाची उचल न केल्यामुळे येथील कोट्यावधी रुपयाचा धान खराब झाल्याचे निदर्शनास आले. दरवर्षी अशा प्रकारे जाणीवपूर्वक कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी करण्यात येत असल्याने या खरेदी केंद्रावरील धान्याच्या नासाडीला आर. एम. व एस. आर. एम. आर हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे व येथील धानाची तातडीने उचल करावी तसेच मका व धान खरेदी. केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या आंदोलना प्रसंगी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here