पत्रकार दिन : वार्ताहराचे कर्तव्य व गुण

0
1469

वार्ताहराचे कर्तव्य व गुण

कर्तव्य : १. नेमके काय घडले आहे याचे आकलन वार्ताहाराला झाले पाहिजे २. त्याची दृष्टि व्यापक, मन व बौद्धिक वार्ता चांगली असली पाहिजे . ३. घटनेचे वार्तामूल्य त्याला कळले पाहिजे . ४. सामाजिक दृष्टिकोण त्याला असला पाहिजे . ५. वार्तामध्ये विविध स्त्रोत त्यांनी निर्माण व विकसित केले पाहिजे . ६. कुठल्याही घटनेकडे प्रत्यक्ष भूमिकेतून त्याला बघता आले पाहिजे . ७. त्याला चांगले सामान्य ज्ञान असले पाहिजे . ८ . वार्ताहराने कश्यातही गुंतू नये . ९ . प्रत्येक घटनेतून बातमी शोधण्याची त्याची नजर असली पाहिजे . १०. वार्ताहरामध्ये शिस्त असली पाहिजे , ११ मिळालेल्या माहितीच्या सत्तेची खात्री पटल्या शिवाय त्यांनी बातमी देवून नये . १२. कुठे बोलावे व कुठे गप्पा राहावे हे त्याला समजले पाहिजे , १३ , वार्ताहराने कधीही निराश होवू नये , १४ , बातमी आणि मत यातील फरक त्याला कळला पाहिजे . १५. कुठल्याही बातमीत त्यांनी आपले मत गुतवू नये .
वार्ताहराचे गुणधर्म
१. वार्ताहराला विविध विषयातील क्षेत्रात शब्दांची माहीती असली पाहिजे . ३. घटनेचे वार्तामूल्य लक्षात घेऊन निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे ३. माहिती देणाऱ्या व्यक्तीचा विश्वास त्यांनी संपादन केला पाहिजे ४. ज्या विषयावर बातमी द्याव्याची आहे त्या विषयाचे संपूर्ण माहिती संकलित केली पाहिजे ५. बातमीदाराने चांगले सामाजिक संबंध निर्माण करायला पाहिजे . ६. त्याची निरीक्षणशक्ती क्षमता चांगली असली पाहिजे . ७ बातमी लिहीण्यापूर्वी वार्ताहराने संपूर्ण वस्तुस्थिती तपासुन घेतली पाहिजे ८ . बातमीतून पूर्ण सत्य सांगण्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे ९ , मानवी स्वभावाचे विविध पैलू समजण्याची कूवत वार्ताहरात घेतली पाहिजे १०. कुठल्याही बातमीचा पाठपुरावा करण्याची चिकाटी त्यात असली पाहिजे . ११. मिळालेली माहिती वेगवेगळ्या माध्यमातून तपासून त्याच्या सत्यतेची खात्री वार्ताहराने करून घेतली पाहिजे .
सहा ‘ क ‘ कार
बातमीच्या पूर्ततेसाठी कोण , कुठे , काय , का , केव्हा व कसे हे सहा ‘ क ‘ कार आवश्यक आहेत .
बातमीचे स्त्रोत –
कुठल्याही वर्तमानपत्राच्या वार्ताहराला विविध विषयावरच्या बातम्या लिहतांना त्या संबंधाची बातमी संकलित करावी लागते . ही माहिती त्याला विविध माध्यमातून प्राप्त होत माहिती मिळविण्याचे हे माध्यम म्हणजे बातमीचा स्त्रोत होय . बातमीच्या या स्त्रोतापैकी बहुतेक वार्ताहराणे स्वत चे , स्वत साठी निर्माण व विकसित केले असतात तर काही स्त्रोत मात्र सर्वांसाठी एकाच वेळी उपलब्ध असू शकतात .
१ ) जनसंपर्क अधिकारी
कुठल्याही संस्थेचा जनसंपर्क अधिकारी हा वार्ताहरासाठी महत्वपूर्ण स्त्रोत ठरतो . साधारणतः कुठलीही संस्था , कंपनी आणि अंशत सरकार द्वारे सुद्धा जनसंपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात असते . संबंधीत कम्पनी संस्था अथवा सरकारची धोरणे निर्णय कार्यक्रम या संदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांचा वापर करून जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य हे अधिकारी करीत असतात . म्हणूनच एखादी कंपनी संस्था अथवा राज्यसरकारच्या कुठल्याही धोरण कार्यक्रम अथवा निर्णय संबंधात माहिती संकलीत करायची असेल तर संबंधातील संस्थेचा जनसंपर्क अधिकारी वार्ताहरासाठी एक महत्वपूर्ण स्त्रोत म्हणून उपलब्ध असते
२ ) प्रेस नोट- प्रसिद्धी पत्रक –
प्रेसनोट ही बातमीचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे . ज्यावेळी एखादी व्यक्ती अथवा संस्थेला त्यांचे कार्यक्रम , धोरण , निर्णय , अथवा मतांना संबंधिची माहिती प्रसार माध्यमातून प्रसारित अथवा प्रकाशित करण्यासाठी लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते तेव्हा या माहितीला प्रसिद्धी पत्रक असे म्हणतात .
३ ) पत्रकार परिषद –
 ज्यावेळी एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेला एखाद्या विषयात संबंधित माहिती प्रसिद्धीसाठी द्यायची असते तेव्हा सदर माहिती वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीला देण्यासाठी त्यांना एखाद्या ठिकाणी निमंत्रण देवून सर्व पत्रकारांना व प्रतिनिधींने एकत्रित करून माहिती दिली जाऊ शकते या प्रक्रियेला पत्रकार परिषद म्हणतात . साधारणत : पत्रकार परिषदेचे निमंत्रण वार्ताहरांना पुरेसा आधी दिले जाते . यात पत्रकारपरिषदेचा विषय , परिषद घेणाऱ्या व्यक्तीचे नांव , दिनांक , व वेळ व स्थळाचाही उल्लेख केला जातो . मात्र अनेकदा एखाद्या तातडीच्या विषयासाठी वार्ताहरांना कधी वेळेवर निरोप देवून पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित केले जावू शकते , अशा पत्रकार परिषदेला तातडीचे परिषद असे म्हणतात . पत्रकार परिषदेत संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहिती संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास पत्रकाराद्वारे प्रश्न विचारली जातात . त्याची उत्तरे संबंधित व्यक्तीने देणे अपेक्षीत असते .
 
४ ) मिट द प्रेस
ही पत्रकार परिषदेच्या उलट प्रक्रिया आहे . पत्रकार परिषदेत एखाद्या विषयासंबंधी माहिती देण्यासाठी एखाद्या व्यक्ती अथवा संस्थेद्वारे पत्रकारांना निमंत्रीत केले जाते . मात्र मिट द प्रेस मध्ये एखाद्या सन्मानिय व्यक्तीला पत्रकारांद्वारे आमंत्रीत केले जाते . पत्रकार परिषदेप्रमाणेच येथे ही प्रश्न उत्तरे होतात . मात्र संबंधित व्यक्ती पत्रकारानेच निमंत्रीत केले असल्याने त्यांचे मन कूठेही दुखावणार नाही अथवा अपमानीत होणार नाही याची काळजी प्रश्न विचारतांना घेतली जाते .
५ ) प्रेस ब्रिटींग
ज्यावेळी एखादी संस्था कंपनी विशेषतः राजकीय पक्षाची बंद द्वार बैठक होते . जेथे वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना वृत्त संकलनासाठी प्रवेश नसतो . अश्या बैठकीत घडलेल्या घडामोडी, झालेले निर्णय, निश्चित झालेले धोरण, कार्यक्रमा संदर्भातील माहिती, संबंधी बैठक संपल्यानंतर अधिकृत बैठक द्वारे वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीला सांगितली जाते . या प्रक्रियेला प्रेस ब्रिटींग म्हणतात . अनेकदा ही माहिती लिखित स्वरूपाची पत्रक काढून सुद्धा दिली जाऊ शकते .
वृत्त संकलनात येणाऱ्या अडचणी
कुठल्याही वर्तमान पत्रात काम करणाऱ्या वार्ताहराला विविध विषयावरच्या वृत्ताचे संकलन करावे लागते . हे वृत्त संकलपन करीत असतांना त्याला अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो . साधने व समाधानाचा अभाव ही वार्ताहरासाठी नेहमी मोठी अडचण असते . अनेकदा बातमी लिहीण्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत कागदपत्रे , अधिकृत सुत्रांकडून न मिळाल्याने ती देखील वार्ताहरासाठी समस्या तयार होते . विशेषतः भ्रष्टाचार अथवा घोटाळ्याच्या बातम्या लिहीतांना वार्ताहराला अधिकृत कागदपत्राची गरज पडत असते . देशाच्या संरक्षण विभागाशी संबंधीत माहिती अनेकदा गोपनियतेच्या कायद्याचा आधार होत उपलब्ध करून दिली जात नाही . सध्या सरकारने सर्वांनाच माहितीचा अधिकार दिला असला तरीही विविध शासकीय कार्यालयात माहिती मिळण्यासाठी होणारी दिरंगाई देखील बार्ताहरासाठी अडचणी ठरत असते याची जाणीव वार्ताहरांनी ठेवावी.
सरदार हरविंदरसिंह धुन्नाजी ९३७०३११०९९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here