नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लरवर सक्त कारवाई करणार – जिल्हाधिकारी विनय गौडा

0
249

नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लरवर सक्त कारवाई करणार – जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर, दि. 27 : जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. याबाबत नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरवर सक्त कारवाई करणार असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले.

जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवाना धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) दगडू कुंभार, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, मुलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, नायब तहसीलदार गीता उत्तरवार, विधी अधिकारी राजेश दुबे तसेच व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, व्हिडिओ गेम पार्लरबाबत प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच वरोरा येथे व्हिडिओ गेम खेळून पैसे हरल्याने एका युवकाने आत्महत्या केली, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब नाही. व्हिडिओ गेम पार्लर परवानाधारकांनी परवान्यातील अटी व शर्तीनुसारच गेम पार्लर चालवावे. सदर पार्लरमध्ये जुगार खेळता कामा नये. तसे आढळून आल्यास नियमानुसार सक्त कारवाई केल्या जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी उपस्थित व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारकांना दिले. तसेच काही व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळल्या जात असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या असून संयुक्त पथकामार्फत तपासणी केल्या जाणार आहे. तपासणीअंती आढळुन आल्यास दोषींवर कार्रवाई करणार असल्याचे निर्देश बैठकीत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here