CSTPS चंद्रपूर मध्ये बेकायदेशीर रीत्या सुरु असलेले मनमर्जी फर्मान आता बंद करा – सुरज ठाकरे

0
585

CSTPS चंद्रपूर मध्ये बेकायदेशीर रीत्या सुरु असलेले मनमर्जी फर्मान आता बंद करा – सुरज ठाकरे

 

 

सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही वर्षापासून CSTPS चंद्रपूर येथील मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात समस्या घेऊन जाणारा कामगारांचे अथवा भेटीस येणारे जनप्रतिनिधी यांचे भ्रमणध्वनी ( मोबाईल ) व ओळख पत्र हे बळजबरीने मुख्य द्वारा लगत असलेल्या काउंटरवर जमा केल्याशिवाय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटण्यास जाऊ दिले जात नाही. असाच एक प्रकार युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्त भूमिहीन झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांन संदर्भात त्यांना रोजगार मिळण्याकरिता CSTPS तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आले असता त्यांच्याशी देखील घडला. परंतु त्यावेळेस CSTPS चे कर्मचारी हे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांचा मोबाईल जमा करण्यात अयशस्वी ठरले. कारण युवा स्वाभिमान पक्ष हा बेकायदेशीररित्या हुकुमशाहीच्या फार्मानाला तथा मानवी अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टींना समर्थन देत नाही. म्हणूनच असा प्रकार अथवा अशाप्रकारची वागणूक इतर जनसामान्य लोकांशी होऊ नये याकरिता जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी CSTPS विभागास माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागितलेल्या माहितीनुसार सर्वप्रथम दिनांक:- ११/०३/२०२२ रोजी शासनाच्या कुठल्या कायद्याअंतर्गत सामान्य माणसाची खाजगी मालमत्ता असलेला त्याचा भ्रमणध्वनी ( मोबाईल ) आपल्या (CE ऑफिस ) कार्यालयामध्ये भेटायला आल्यानंतर आपण जमा करायला लावता, त्या कायद्याची इत्यंभूत माहिती देण्यात यावी अशा स्वरूपाची माहिती मागितली असता दिनांक:- १८/०४/२०२२ रोजी अखेर CSTPS कार्यालयातून माहिती अधिकारांतर्गत माहिती आम्हास प्राप्त झाली.

 

परंतु इंग्रजी मध्ये दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेल्या अधिनियमानुसार प्लांट एरिया मध्ये मोबाइल अथवा कुठलेही इलेक्ट्रिकल एक्युपमेंट्स अर्थात स्मार्टफोन घेऊन जाण्यास परवानगी नाही. कारण प्लांटमध्ये अर्थात ज्या ठिकाणी विजेचे उत्पादन होते त्या ठिकाणी प्लांट च्या सेफ्टी च्या अनुषंगाने त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणे व तेही फक्त स्मार्ट फोन वापरणे बंधनकारक असले तरी आम्हास प्राप्त माहितीनुसार प्लांट बाहेर असलेले आपले शासकीय कार्यालयाबाबतीत अशाप्रकारे कुठलेही नियम निदर्शनास आलेले नाहीत. त्यामुळे प्लांट आणि शासकीय कार्यालय या दोन विभिन्न गोष्टी असल्याने CE कार्यालय हे शासकीय कार्यालय असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी आहे असे एकंदर मिळालेल्या माहितीमध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे आता CE यांच्या कार्यालयांमध्ये येणाऱ्या खाजगी कामानिमित्त शासकीय कामानिमित्त जनसामान्य जनप्रतिनिधी लोकांचे मोबाईल जप्त करून ठेवणे हे स्पष्टपणे बेकायदेशीर आहे. व सदर बाब ही अत्यंत गंभीर असून देशाच्या घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराचे व सामान्य माणसाच्या स्वातंत्र्याचे हननं असल्याने युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी दिनांक:- २१/०४/२०२२ ला या गंभीर विषयाबाबत निवेदन देऊन CSTPS चंद्रपूरच्या प्रशासनाला ही प्रथा बंद करून नंतर असे परत होऊ नये याची दखल त्यांना घेण्यास सांगितले व शासनाच्या अधीन राहून घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करत बेकायदेशीरपणे वागू नये! तथा दिलेल्या माहितीनुसार शासकीय कार्यालयामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करणे संदर्भात कुठलाही नियम व कायदा नाही तरीदेखील कार्यालयांमध्ये सुरू केलेले बेकायदेशीर फर्मान तात्काळ बंद करण्यास सांगून व जनसामान्यांची बेकायदेशीरपणे खाजगी वस्तू कार्यालयांमध्ये बळजबरीने शासनाचे नाव सांगून व कुठलाही नियम नसताना असा नियम आहे! असे सांगून जमा ठेवणे व त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचे काम बंद करावे असे यावेळी निवेदनाच्या स्वरुपात सांगण्यात आले. अन्यथा CSTPS च्या विरोधामध्ये युवा स्वाभिमान पक्ष न्यायालयामध्ये दाद मागणार अशी चेतावणी सदर निवेदनाद्वारे यावेळेस देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here