भाजपाच्या वतीने विविध मागण्यांसाठी-उद्या कोरपण्यात भव्य मोर्चाचे आयाेजन व धरणे आंदोलन! काेरपना

0
389

भाजपाच्या वतीने विविध मागण्यांसाठी-उद्या
कोरपण्यात भव्य मोर्चाचे आयाेजन व धरणे आंदोलन! काेरपना

किरण घाटे
महाराष्ट्रातील महिलांवरील दिवसे गणिक वाढणारे अत्याचार लक्ष्यात घेता सरकार या अत्याचारां विषयी अधिक गंभीर झालेले दिसत नाही या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी तदवतच अनेक ज्वलंत समस्या व मागण्यांसाठी भाजपा महिला मोर्चा,भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा यांचे संयुक्तिक विद्यमाने भूतपूर्व मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, हंसराजजी भैया अहीर (माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री) देवरावभाऊ भो़ंगळे( भाजपा जिला अध्यक्ष चंद्रपुर) संजयभाऊ धोटे (माजी आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. १२ आँक्टाेबरला दुपारी १२वाजता काेरपण्यात भव्य मोर्चाचे आयोजन तथा या साेबतच धरणे आंदोलन आयाेजित करण्यात आले आहे भाजपा पदाधिकारी, महिला आघाड़ी,युवा मोर्चा आघाड़ी, जिला परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच, उपसरपंच,शाखा पदाधिकारी नगरसेवक, विविध आघाड्यांचे,पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या आयाेजित मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहान भारतीय जनता पार्टी, महिला आघाड़ी व युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी एका पत्रकातुन केले असल्याची माहिती काेरपना तालुका भाजपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी आज दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here