श्री गुरुदेव सेवाश्रम आमगावच्या सदस्य पदी डॉ. श्याम हटवादे यांची नियुक्ती!

0
378

श्री गुरुदेव सेवाश्रम आमगावच्या
सदस्य पदी डॉ. श्याम हटवादे यांची नियुक्ती!

चंद्रपूर । किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवाशी डाँ. श्याम हटवादे यांची अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी द्वारा संचालित श्री गुरुदेव सेवाश्रम आदर्श आमगावच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरहु नियुक्ती आश्रम सेवाधिकारी राजू देवतळे यांनी केली असून त्यांना या नियुक्तीबाबतचे पत्र देण्यात आले आहे.

या वेळी केंद्रीय सदस्य प्रा. अशोक चरडे, प्रांत सेवाधिकारी विठ्ठलराव सावरकर, किसन पंधरे व उत्तम रोकडे उपस्थित हाेते. डाँ. हटवादे यांचे नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन हाेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here