छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष उर्जा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत – आ. किशोर जोरगेवार 

0
420

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष उर्जा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत – आ. किशोर जोरगेवार 

शिवजयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमात उपस्थिती


चंद्रपूर : जाती-पातीच्या भिंती तोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जनतेला समान न्याय दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हणून संबोधले जाते. स्वराज्य निर्मितीचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम हे सर्वानाच प्रेरणादायी आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणा या उर्जा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त आज शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. सकाळी छत्रपती शिवाजी चौक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना मानवंदना केली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, सविता दंडारे, नकुल वासमवार, सलिम शेख, राम जंगम, हर्षल कानमपल्लीवार, देवा कुंटा, अॅड. परमहंस यादव, तापोश डे, किशोर बोलमवार, दुर्गा वैरागडे, वंदना हजारे, चंपा विश्वास यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी ऋित्वीक धकाते आणि चित्रांश आश्राम या दोन चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि थोर पुरुषांबददल सुंदर असे मागर्दशन केले. दादमहवार्ड, बाबुपेठ, इंदिरानगर, तुकुम, भिवापूर येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, पुन्हा एकदा रयतेचे राज्य स्थापन करण्याची गरज आहे. नागरिक सुचवतील तेच काम करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. चंद्रपूरचा ईतिहास फार जुना आहे. जवळपास 500 वर्षा पुर्वीच्या या शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक नसणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. येथे शिवरायांचे अश्वरूढ स्मारक व्हावे यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात शिवप्रेमींचीही मला साथ हवी असल्याचे ते यावेळी म्हणाले. शिवराय नेहमी मोठा विचार करायचे त्यामुळे त्यांच्याकडून आपण मोठे स्वप्न पाहण्याची ताकद आणि ती स्वप्न सत्यात उतरविण्याची हिम्मत घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रवादाचे जिवंत प्रतीक होते. अष्टपैलुत्वाने समृद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व धर्मातील नागरिकांना समान न्याय दिल्या जायचा. प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर कर्तुत्वान होते, त्यांनी अतिशय खडतर परिस्थिती मधून केलेली स्वराज्य निर्मिती हे सर्व जनतेसाठी प्रेरणादायी असल्याचे ते ते यावेळी म्हणाले. सदर कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांची व शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here