दिंदोडा बॅरेज प्रकल्पाची संपादित जमिन रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाला हस्तांतरित होणार

0
514

दिंदोडा बॅरेज प्रकल्पाची संपादित जमिन रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाला हस्तांतरित होणार

प्रस्ताव १५ दिवसात नियामक मंडळाच्या बैठकीत ठेऊन निर्णय घेण्यात येईल

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पत्राची जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी घेतली दखल

खासदार बाळू धानोरकर यांची कार्यकारी संचालक व्ही आय डी सी नागपूर यांच्यासोबत बैठक

 

 

चंद्रपूर : माढेळी वरोरा राज्य मार्ग ३७१ हा रस्ता वरोरा शहरातून जातो. शहरातील अरुंद वळणमार्ग व वळणे यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. शहरात वाहतुकीची कोंडी देखील होत असते. सदर रस्त्याचे बांधकाम जलसंपदा विभागात असून या रस्त्याचे बांधकाम कार्यासाठी बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्राद्वारे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्यांनी हा प्रस्ताव नियामक मंडळाकडे पाठवून अहवाल मागविला आहे. आज खासदार बाळू धानोरकर यांनी कार्यकारी संचालक वि आय डी सी नागपूर यांच्याकडे बैठक घेतली, त्यात प्रस्ताव १५ दिवसात नियामक मंडळाच्या बैठकीत ठेऊन निर्णय घेऊन दिंदोडा बॅरेज प्रकल्प संपादित जमिनीचा रस्त्याच्या कामासाठी संपादित जमीन बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

 

 

 

आज नागपूर येथील कार्यकारी संचालक व्ही आय डी सी मोहिते यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री पाटील साहेब, व्हीआयसी गुप्ता, क्षेत्रीय प्रबंधक माजरी, कार्यकारी अभियंता कुंभे यांची उपस्थिती होती.

 

 

 

वरोरा तालुक्यातील एकोणा येथे वेकोलीची कोळसा खाण असून या खाणीतून निघणारा कोळसा वरोरा औद्योगिक वसाहती मधील वर्धा पावर,जिएमआर आणि चंद्रपूर येथील धारिवाल पावर प्लान्टला पुरविला जातो. खान सुरू होऊन दोन वर्षा पेक्षा अधिक काळ झाला असला तरीही वेकोलीने कोळशाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक रस्ता तयार केलेला नाही. सदर कोळशाची वाहतूक करणारी वाहने माढेळी-खांबाडा मार्गे जातात. या रस्त्याची क्षमता कोळसा वाहतूक करणाऱ्या जड वाहतुकी करिता पुरेसी नसल्याने रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे. मोठी वर्दळ असणाऱ्या या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने त्याचा फटका विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि वाहन चालक व प्रवासी अशा सर्वांना बसत आहे. परिणामी नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.वेळोवेळी ग्रामस्थ कोळसा वाहतूक अडवून रस्त्याच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

 

 

हा प्रकार खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणी तातडीने बैठक घेण्याचे निर्देश देऊन वरोरा उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला वर्धा पॉवर कंपनीचे महाव्यवस्थापक दिलीप जोशी, उप महाव्यवस्थापक नाना माटे, जीएमआर कंपनीच्या कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे प्रमुख विनोद पुसदकर, कोलसोर्सेस विभागाचे व्यवस्थापक आकाश सक्सेना, धारीवाल चंद्रपूर सीएसआर व्यवस्थापक तातेवार, वेकोलि चे व्यवस्थापक व्ही.के.गुप्ता यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कोळसा ट्रान्सपोर्टर उपस्थित होते. या बैठकीत खासदार बाळू धानोरकर यांनी माढेळी ते खांबाडा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरवात होण्यार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here