सुरजागड पहाडीवरील उत्खनन तात्काळ थांबवा

0
461

सुरजागड पहाडीवरील उत्खनन तात्काळ थांबवा

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची निवेदनातुन मागणी

 

 

एटापल्ली (गडचिरोली), ✍️ सुखसागर झाडे

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील मे.लाईड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड चंद्रपूर या कंपनीद्वारे उत्खनन करत आहेत.त्यामुळे सदर उत्खनन तात्काळ थांबवून लोहखनिज खाणीमध्ये ब्लास्टिंगद्वारे होणारी खोदकामाची परवानगी नाकारण्यात यावी. अशी मागणी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

 

 

निवेदनात असे म्हंटले आहे की,13 एफ्रिल 2007 चे आदेशानुसार संबंधित कंपनीला शासनाकडून लोहदगड उत्खनन करून खनिज गडचिरोली जिल्हा बाहेर नेण्यास मंजुरी देण्यात आली.या अंतर्गत 20 अक्टोबर 2008 रोजीच्या आदेशानव्य खाणकाम करण्यास मंजुरी प्रदान करण्यात आले.मात्र कंपनीद्वारे होत असलेल्या उत्खननामुळे शासनास प्राप्त होणाऱ्या महसूल सुद्धा दुबत असल्याची निवेदनात म्हंटले आहे.भविष्यात सुद्धा कंपनीकडून असेच प्रकार होत गेली तर शासनाला लाखो रुपयांची उत्पन्न नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरजागड येथील लोह खाणीत ब्लास्टिंगद्वारे लोह काढत असल्याने पर्यावरनात विपरीत परिणाम होत आहे. एटापल्ली तालुक्यातील सर्व ग्राम सभेचे लोह खनिज कंपनीला विरोध असतांना सुद्धा कंपनी ब्लास्टिंग करण्यासाठी परवानगी मागत आहे.शासनाकडून ब्लास्टिंग करण्यासाठी परवानगी दिले तर भविष्यात नैसर्गिक साधन संपत्तीची हानी होण्याची दाट शक्यता आहे.असेही या निवेदनात म्हटले आहे.सदर लोहखनिजला एटापल्ली तालुक्यातील ग्रामस्थांनी विरोध असतांना सुद्धा खनिज उत्खनन होत आहे. तरी ही उत्खनन त्वरित बंद करण्यात यावे म्हणून अहेरी विधानसभेचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.

 

 

यावेळी उपस्थित दिपकदादा आत्राम माजी आमदार. नंदूजी मठामी आविसचे तालुका अध्यक्ष एटापल्ली, श्रीकांत चिप्पावार तालुका उपाध्यक्ष, आविस गणेश गावडे तालुका सचिव, सुधाकर गोटा, राजू गोमाडी, सुनील मडावी उपसरपंच, केशव कुडयेठी, रमेश दुग्गा,जुलैक शेख,विजय कूसनाके आदी आदिवासी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here