वणीचे ग्रामीण ‘रुग्णालय’च पडले आजारी

0
585

वणीचे ग्रामीण ‘रुग्णालय’च पडले आजारी

प्रशासनाला जाग आणण्यासाठी तेरा दिवसाचे “जागते रहो” दशादर्शक आंदोलन

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले

वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व मनमानी कारभारामुळे या ठिकाणची रुग्णसेवा संपुर्णतः कोलमोडुन आलेली दिसत असून रुग्णालयच आजारी पडल्याचे दिसून येत आहे. दवाखान्यात भुलतज्ञ नसल्यामुळे सर्हास बाळंतपणाचे महिला रुग्ण रेफर केले जातात. यामध्ये नार्मल डिलेव्हरी होणारी सुद्धा रेफर केली जाते.

 

 

दि. २५/९/२०२१ रोजी सुषमा दिलीप सोनुले रा. कायर ही महिला प्रसुती करीता ग्रामीण रुग्णालय वणी येथे भरती झाली असता दुसऱ्या दिवशी सदर महिलेला बाळ पायाळू आहे, पोटात पाणी कमी झाल्यामुळे या पेशंटला रेफर करावे लागते असे कारण सांगून महिलेला रेफर करण्यात आले. त्यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलाकर पोहे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिल माहिती दिली. शिवसेना शहर प्रमुख राजू तुरणकर यांनी या संदर्भात तुम्ही अनेक महिला रुग्ण या पूर्वी अश्या पद्धतीने रेफर केले परंतू समोरील दवाखान्यात त्यांची प्रसुती नार्मलच झाल्या आहे, असे या महिलेच्या संदर्भात असे झाले तर काय ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला होता. सुषमा दिलीप सोनुले या महिलेचे शनिवार रात्री १२ वाजता चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे एक सलाईन लावल्यानंतर लगेच नार्मल प्रसुती झाली, तीला मुलगा झाला. त्यामुळे येथील डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

या संदर्भात अनेकदा वणीचे ग्रामीण रुग्णालय रेफर केन्द्र झाल्याच्या बातम्या प्रकाशीत झाल्या आहे. रेफर केंद्र बनल्यामुळे अनेक रुग्णांचे उपचारविणा जीव गेले आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या बाजुला लेबर रूमचे बांधकाम चालू असल्यामुळे खोदकाम करतांना पाईप फुटल्याने रुग्णांच्या वॉर्डमध्ये चार ते पाच दिवस पाणी उपलब्ध नव्हते. रुग्णालयातील रुग्ण बाहेरून पाणी आणुन आपली व्यवस्था करीत होते. या संदर्भात येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुलभेवार यांनी उडवाउडवीचे उत्तरे देवुन हे माझे कामे नाही असे म्हणुन आपली जवाबदारी झटकावली.

 

 

 

वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्ती देण्याचे अधिकार कोणाला आहे व अश्या प्रतिनीयुक्त्या कोणाच्या आदेशाने दिल्या जाते त्यावर आपली किंवा शासनाची मान्यता घेण्यात येते काय ? जनतेसमोर शासन दरबारी हे दाखविले जाते की, वैद्यकीय अधिकाऱ्याची निकड आहे. परंतु ज्या ठिकाणी भरमसाठ वैद्यकीय अधिकारी देवुन सुद्धा ते एका महिण्यात फक्त ६ ते ७ दिवसच सेवा देवुन उर्वरीत २३ दिवसाचा घरबसल्या पगार घेतात, ही बाब आपले निदर्शनात आली नाही काय किंवा जिल्ह्यातील नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निदर्शनात आली नाही काय? यात त्यांची भुमिका संशयास्पद वाटते. याद्वारे मी आपणास हे सुद्धा सांगु इच्छितो की एक ते दोन नियमीत वैद्यकीय अधिकारी वगळता (ही बाब उ. जि. रुग्णालय) व एक वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय येथे बाह्य रुग्ण विभाग तपासणी करीतो व बाकीचे सर्व अधिकारी हे शासनाचे अनुदान लाटून आपापल्या व्यवसायात दंग राहतात ही बाब गांभीर्याने घेवुन चौकशी करण्यात यावी.आपण एक जबाबदार, संवेदनशिल, गोरगरीब जनतेच्या आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यास तत्पर व वेळप्रसंगी कठोर भुमीका घेणारे असे अधिकारी आहात. याद्वारे आपणास निवेदन आहे की, याबाबीची सखोल चौकशी (नुसती चौकशी नाही) तर कार्यवाही करून नियमबाह्य सुरु असलेली प्रथा त्वरीत बंद करावी. वैद्यकिय अधिकाऱ्यांची उपस्थिती कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमीत राहील. यावर लक्ष ठेवुन गोरगरीब जनतेला रुग्णसेवा उपलब्ध करुन द्यावी. ग्रामीण रुग्णालयात संपुर्ण औषधीचा साठा असावा, स्वच्छता राखावी, येणाऱ्या रुग्णांची डॉक्टरांनी चौकशी केल्याशिवाय परिचारीकेने औषधोपचार करु नये. करोडो रुपयांचा निधी उपलब्ध असतांना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध आणण्यासाठी सांगणे बंद करून सर्व प्रकारच्या औषधींचा साठा उपलब्ध ठेवावा व औषधे उपलब्ध नसल्यास वैद्यकीय अधिकारी यांनी अत्यावश्यक बाब म्हणून ती औषधी तात्काळ उपलब्ध करून द्यावी या संदर्भात आपल्या प्रशासनाने त्वरीत दखल घेवुन ग्रामीण रुग्णालयातील संपुर्ण कारभाराची सुधारणा करावी, यासाठी निर्लज्ज प्रशासनाला त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी व रुग्णांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना वणी शहरप्रमुख राजू तुरणकर व युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, युवासेना माजी शहर प्रमुख ललित लांजेवार, विभाग प्रमुख मंगल भोंगळे, युवासेना माजी शहर संघटक महेश पहापले, मनीष बतरा, बबन केळकर,मिलिंद बावणे, तुलसी तेवर, शाखा प्रमुख जनार्धन थेटे, राजेश पारधी, गणेश जुनगरे, मनीष नरपांडे, मुन्ना बोथरा, उमेश पोद्दार,मोंटू वाधवणी,राहुल झत्ते,हितेश गोडे, निखिल तुरणकर, विलास वांढरे, संदीप फाले,शंकर देरकर, तर्फे तेरा दिवसाचे जागते रहो हे अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here