पाईप कन्वेयर बेल्ट मध्ये प्रकल्पग्रस्तांना रोजगारात सामावून घ्यावे

0
392

पाईप कन्वेयर बेल्ट मध्ये प्रकल्पग्रस्तांना रोजगारात सामावून घ्यावे

प्रकल्पग्रस्तांची ऊर्जा राज्य मंत्र्यांकडे मागणी

 

दुर्गापुर/चंद्रपूर : मौज भटाडी व सीएसटीपीएस येथिल पाइप कन्वेयर बेल्ट या प्रकल्पात सन २०१८-१९ मध्ये २४ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात आली. यावेळी तत्कालीन मुख्य अभियंता सीएसटीपीएस ऊर्जानगर यानी प्रकल्पग्रस्ताना उपरोक्त प्रकल्पात या २४ प्रकल्प ग्रस्ताना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मौखिक आश्वाशन दिले होते.
मात्र नवीन प्रकप्लात फक्त १० लोकाना प्रायोगिक तत्वावर रोजगार देण्यात आला. ९ गेट पास देऊन सुद्धा त्या प्रकल्प ग्रस्तांना अजुन पर्यंत रोजगार देण्यात आलेला नाही. याकरिता मंत्री महोदय यांनी स्वतः यात जातीने लक्ष घालून त्वरित प्रकल्प ग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांना सामावून घेण्याची कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यत येईल. यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहिल असा इशारा देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना सचिन उपरे, अशोक गिलबिले, महेश घोरपडे, ईश्वर रायपुरे, मारोती झाडे व इतर प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here