काढोली (खु) येथे शिवाजी महाराज जयंती साजरी

0
504

काढोली (खु) येथे शिवाजी महाराज जयंती साजरी

 

 

आवाळपूर :- कडोली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता मसे, उद्घाघाटक सविताताई लांडे पोलीस पाटील, प्रमुख वक्ते प्रलभ म्हशाखे, तर विशेष अतिथी म्हणून शंकर बोढे, विनोद दोहे उपसरपंच, राजु कुळसंगे अध्यक्ष तंटा मुक्त समिती, उपस्थित होते. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुक्त वक्ते प्रलभ म्हशाखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमा प्रसंगी बारावी मध्ये प्रथम व द्वितीय अनुक्रमे नंदिनी पिंपळशेंडे 85 टक्के, किरण देशमुख 83 टक्के, तसेच दहावी मध्ये प्रथम व द्वितीय चैतन्या पिंपळशेंडे 92 टक्के, प्रतीक्षा देशमुख 85 टक्के या विद्यार्थ्याचा शिल्ड, शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच शाळकरी मुलांचे भाषण व नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन गणेश देरकर, प्रास्ताविक दत्ता उपरे तर आभार रितीक आस्वले यांनी मानले. कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता शिवराजे स्पोर्टिग क्लबचे सदस्य व ग्रामवासियानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here