राजुरा येथे ५० खाटांचे ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर मंजुर
राजुरा । राहुल थोरात : राजुरा विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी विविध विकास योजनांना मंजुरी मिळवुन घेतली आहे. राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोणावर मात करण्यासाठी 50 खाटांचे ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर मंजुर झाले आहे. याप्रमाणे राजुरा तालुक्यात विकासाच्या योजना मंजुर केल्या यामध्ये अर्थ संकल्प 2020.21 मध्ये 17.50 कोटीची कामे मंजुर केली. बामणी राजुरा लक्कडकोट रस्त्याची दुरुस्ती 13.50 कोटी मंजुर. राजुरा ते गोविंदपुर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 20 कोटी मंजुर. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत उमरझरा ते बापुनगर. कोलामुडा 1 कोटी 50 लक्ष मंजुर. अंतर्गत विहिरगांव ते अमृतगुडा 15 कोटी मंजुर. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत 1 कोटी 51 लक्ष मंजुरए 2515 ग्राम विकास निधी अंतर्गत 2 कोटी 41 लक्षची कामे मंजुर. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत 32 लक्षाची कामे मंजुर. ठक्कर बापा योजना अंतर्गत 12.50 लक्षाची कामे मंजुर. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत पुलाचे बांधकामाकरीता 24 कोटीचे कामे प्रस्तावित.
राजुरा नगर परिषद वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत 4 कोटी मंजुर केले. राजुरा शहरातील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळा ईमारत बांधकामासाठी 1 कोटी मंजुर. राजुरा नगर परिषदेला रस्ता अनुदाणासाठी 35 लक्ष मंजुर करण्यात आला. राजुरा येथील वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत सरदार पटेल लायबरी येथे सौंदर्यीकरण करणेसाठी 1 कोटी मंजुर केले.मुख्याधिकारी अग्निशमन निवास बांधकामासाठी 59 लक्ष मंजुर केली. आमदार निधी अंतर्गत राजुरा नगर परिषदेला शवरथ ;स्वर्ग रथ उपलब्ध करून देण्यासाठी 13 लक्ष मंजुर. 15 वा वित्त आयोगा मधून 44 लक्ष मंजुर. राजुरा नगर परिषदेला नागरोत्थान योजनेअंतर्गत 46 लक्ष मंजुर. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 96 लक्ष उपलब्ध करून दिले. नागरी दलीतेत्तर योजनेअंतर्गत 36 लक्ष रस्ते नाल्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिले. राजुरा नगर परिषेदेचे तलाव सौंदर्यीकरणाचे रखडलेले काम पूर्ववत सुरु करणार. राजुरा उपविभागातील भोग. वर्ग २ चे १ मध्ये रुपांतर करण्याबाबतची प्रक्रिया गेली ५ वर्षापासून थंड वस्त्यात होती. ते पूर्ण करण्यासाठी महसुल विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुरु आहे. नरभक्षी वाघाच्या बंदोबस्ता साठी राज्याचे मुख्यमंत्री व वन मंत्री आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाटाखाटी करून वाघाचा बंदोबस्त करण्यास भाग पाडले. वाघ हल्यात मुत्यु पावलेल्या १० पिडीत कुटुंबियांना प्रत्येकी १५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत मिळवुन दिली. राजुरा तालूक्यातील १ वर्षात वरील विकास कामांना मंजुरी मिळवुन घेतली. अशी माहिती राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, हमीदभाई, नगराध्यक्ष अरुण धोटे, कार्यकारी नगराध्यक्ष सुनील देशपांडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, राजुरा तालुका काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष रंजन लांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेन्डे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राव, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, पंढरी चंन्ने यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य प्रफुल्ल शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी केले.