विरकुंड शेत शिवारात शेतकरी आणि वाघीण आमने सामने

0
649

विरकुंड शेत शिवारात शेतकरी आणि वाघीण आमने सामने

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

वणी तालुक्यातील विरकुंड येथे शेतात जाताना एका शेतकऱ्याला अचानक वाघीण दिसल्याने तो जागेवरच स्तद्ध झाला.दोघांची नजारानजर झाली. तेथे हा खेळ काही वेळ चालूही होता.मात्र अचानक वाघीणीने डरकाळी फोडली आणि शेतकरी हा झाडावर चढला.मात्र वाघीणीने पिच्छा काही सोडला नाही.वाघीण सतत झाडाखाली घिरक्या मारतच.अखेर त्या शेतकऱ्यांनी हतबल होऊन गावाकऱ्यांना भ्रमणद्वणी वरून आपली आपबीती सांगितली. आणि गावकरी लाठ्या काठ्या घेऊन शेत शिवारात आले.मात्र वाघीण जाण्यास तयार नाही. अखेर गावाकऱ्यांनी फटाके वाजवून वाघिणीला पळवून लावले. ही थरारक घटना आहे वणी तालुक्यातील विरकुंड शेत शिवारातील…..

विशाल भाऊराव ठाकरे (35) रा. मारेगाव कोरंबी.यांचे विरकुंड शिवारात शेत असल्याने तो नेहमी प्रमाणे शेतात जाण्यास निघाला.मात्र तो पायवाटेनी जात असतानी वाटेतच त्याला एका ओढ्याच्या पात्रात पट्टेदार वाघीण व बछडे दिसले.वाघीण दिसताच तो हालचाल न करता जागेवरच स्तद्ध झाला आणि काही वेळातच वाघिणीने डरकाळी फोडली आणि विशाल हा धावत जाऊन झाडावर चढला विशाल हा धावतअसल्याचे बघता वाघीनही त्याच्या मागे धावली.मात्र म्हणतात न देव तारी त्याला कोण मारी त्याचाच प्रत्यय आला तो वणी तालुक्याचे विरकुंड या शेत शिवारात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here