केन्द प्रमुख रोहणकर यांचा सत्कार 

0
451

केन्द प्रमुख रोहणकर यांचा सत्कार 

पोम्भुर्णा:-चान्दा शिक्षण प्रसारक मंडळ, चन्द्रपुर द्वारे संचालीत जनता विद्यालय पोम्भुर्णा येथे पोम्भुर्णा, देवाडा खुर्द केन्द्राचे प्रमुख विलास सिताराम रोहनकर यांची गोडपिपरी पंचायत समिती शिक्षण विभाग येथे बदली झाल्याने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अमरसिंह बघेल तर प्रमुख अतिथी प्रेमसिंह मुडे, नरेंद्र दुधबावरे उपस्थिती होती. या प्रसंगी यथोचित सत्कार करुन त्याच्या कर्तव्यनिष्ठा, सात्यतता,मनमिळाऊ स्वभाव, दिलखुलास व्यक्तिमत्व यांचा उल्लेख करून त्यांच्या सहकार्य बद्दल आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पेन्टेवार तर आभार प्रदर्शन व्यंकटेश चलाख यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here