भाजपाचे पोंभूर्णा वीज वितरण कंपनीला घेराव

0
371

भाजपाचे पोंभूर्णा वीज वितरण कंपनीला घेराव

पोंभूर्णा :-

पोंभुर्णा तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतांना संबंधित अधिकारी, कर्मचारी मात्र या समस्यांकडे कानाडोळा करीत आहेत. वीजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण असून याबाबत कुणी जाब विचारला तर संबंधितांकडून उडवा उडवीची उत्तरे दिल्या जाते. वीज खंडित प्रकरणी पोंभूर्णा भाजपा तर्फे मुजोर वीज वितरण कंपनी ला घेराव घालून तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.

 

पोंभूर्णा तालुक्यात ७१ खेडे असून ३१ ग्रामपंचायत आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.पोंभूर्णा शहर व ग्रामिण भागात विज वितरण कंपनी विज पुरवठा सुरळीत करण्यास सक्षम नसल्याने

सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

वीज पुरवठेसंबंधीत लवकरात लवकर समस्येचे निराकरण करा अन्यथा जनसामन्याच्या भावनांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.

आणि जर हि परिस्थिती अशीच राहली तर पोंभूर्णा भारतीय जनता पार्टी तर्फे वीज वितरण कंपनी च्या मनमानी कारभारा विरुद्ध जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या प्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अजय मस्के, ईश्र्वर नैताम, गुरूदास पिपरे, मोहन चलाख, आदित्य तुम्मूलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील बहूसंख्य नागरिक उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here