आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य दिव्यागांना तीनचाकी सायकलचे वितरण

0
418

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य दिव्यागांना तीनचाकी सायकलचे वितरण

एम एच 34 सुशिक्षित बेरोजगार इंजिनिअर गृप व यंग चांदा ब्रिगेडचे आयोजन

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्य एम एच 34 सुशिक्षित बेरोजगार इंजिनिअर गृप व यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिव्यांगाना तिन चाकी सायकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जटपूरा गेट येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, काॅंग्रेस कमिटीचे घूग्घूस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, आरपीआयचे नेते सिध्दार्थ पाथडे, प्रा. सुर्यकांत खणके, यंग चांदा ब्रिगेडच्या दिव्यांग विभागाच्या प्रमूख कल्पना शिंदे, शहर संघटीका वंदना हातगावकर, शहर संघटक पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेडचे युवक अध्यक्ष कलाकार मल्लारप, करणसिंह बैस, शिक्षण विभागाचे प्रमूख प्रतिक शिवणकर, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलीम शेख, अल्पसंख्याक विभागाचे युथ प्रमूख राशेद हुसेन, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, सोशल मिडीया प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, एम एच 34 सुशिक्षित इंजिनिअर गृपचे सोहेल शेख, योगेश भांदककर यांच्यासह इतर सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

काल शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून सांयकाळी 6 वाजता जटपूरा गेट येथे दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 17 दिव्यांग बांधव व भगीनींना आमदार किशोर जोरगेवार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तीनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले. दिव्यागांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. दिव्यांग बांधवांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमही आयोजीत करणार असून विविध शासकीय योजना दिव्यांगांपर्यत्न पोहचविण्यासाठी आपण यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात दिव्यांग मदत केंद्रही सुरु करणार असल्याचे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे संघटक आनंद इंगळे, रुपेश कुंदोजवार, बादल हजारे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची व दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here