भजन महोत्सवाच्या माध्यमातुन चंद्रपूरातील आध्यात्मिक परंपरा जपणार – आ. किशोर जोरगेवार

95

भजन महोत्सवाच्या माध्यमातुन चंद्रपूरातील आध्यात्मिक परंपरा जपणार – आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या 4 दिवसीय विविध भाषीय भजन महोत्सवाला सुरवात, आ. जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन

महाशिवरात्री निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विविध भाषीय भजन महोत्सवामुळे शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. सलग चार दिवस या भजन महोत्सवाच्या माध्यमातून ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणासह समाज प्रबोधन केल्या जाणार आहे. भजन महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. सुरु झालेली ही सुरवात परंपरा बनणार असुन यातुन चंद्रपूरातील आध्यात्मिक पंरपरा जपल्या जाईल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महाशिवरात्री निमित्त अंचलेश्वर मंदिरातील प्रागंणात विविध भाषीय चार दिवसीय भजन महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. आज यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या भजन महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला संत मनीष महाराज, साईबाबा मंदिराचे पुजारी मसादे महाराज, माता महाकाली महोत्सव समितीचे तथा महाकाली मंदिरचे सचिव सुनिल महाकाले, अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्ह्या प्रचारक ग्रामगीताचार्य दादाजी नंदनवार, अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका प्रचारक काटपे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी चोपडे, अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक श्याम धोपटे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम राऊत, सुधाकर चकनलवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्हाला मोठी धार्मिक आणी आध्यात्मिक परंपरा लाभली आहे. याचे आपण जतन केले पाहिजे. युवा पिढीला याची माहिती झाली पाहिजे. चंद्रपूरच्या माता महाकाली ची महती राज्य स्तरावरावर पोहचविण्यासाठी आपण चंद्रपूरात माता महाकाली महोत्सव आयोजित केला होता. यात चंद्रपूरकरांचा लाभलेला सहभाग कौतुकास्पद होता. दरवर्षी आपण हे आयोजन याच भव्यतेसह करण्याचा संकल्प घेतला आहे. मतदार संघातील सर्व माता मंदिरामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दिशेनेही आमचे प्रयत्न सुरु आहेत. शहरातील धार्मिक, आध्यात्मिक वातावरण कायम टिकुन राहिले पाहिजे. समाजानेही अशा आयोजनात सहभाग घेतला पाहिजे. विकास कामे होत आहे. ती पूढेही होत राहतील परंतु मानवी मनाच्या शुध्दीकरणासाठी आध्यात्मिकतेची गरज आहे. आणि असे आयोजन त्याला पूरक ठरतील असा विश्वास यावेळी त्यांनी बोलून दाखवली.

भजन हा भक्तिसंगीतातील व भक्तिमार्गातील एक महत्वपूर्ण प्रकार आहे. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून वारकरी संप्रदायाने भजनगायनाची परंपरा नामदेवांच्या काळापासून सुरू केली. नामस्मरणाचा प्रमुख प्रकार म्हणून भजन या घटकास वारकरी परंपरेने महत्त्वपूर्ण स्थान दिले. संत परंपरेतील ही पंरपरा आता आपल्याला समोर न्यायची आहे. विविध भाषीय भजन महोत्सव कदाचीत महाराष्ट्रील एकमेव आयोजन असेल. आणि याची सुरवात जर माता महाकालीच्या पवित्र चंद्रपूर नगरीतून होत असेल तर ही चंद्रपूरकरांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी गर्वाची बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी अंचलेश्वर मंदिर येथे पुर्जा अर्चना केली.

सदर भजन महोत्सवात मराठी, तेलगु, बंगाली, हिंदी, गुजराती, पंजाबी, छत्तीसगडी, गोंडी, मारवाडी यासह अनेक भाषीय 300 हुन अधिक भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या आशा देशमुख, सविता दंडारे, विमल काटकर, कल्पना शिंदे, वंदना हजारे, चंद्रशेखर देशमुख, मुन्ना जोगी, शांता धांडे, अस्मिता दोनारकर, स्मिता वैद्य, विलास वनकर, गोपी मित्रा, सदनामसिंग मिर्धा, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडची पुरुष व महिला आघाडी परिश्रम घेत आहे.

advt