ग्रामपंचायत च्या पुढाकारातून वढोलीत नाली स्वच्छताचे काम सुरू

0
503

ग्रामपंचायत च्या पुढाकारातून वढोलीत नाली स्वच्छताचे काम सुरू

गोंडपिपरी (सूरज माडुरवार)

पावसाळ्याला सुरवात झाली असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वढोली येथे संपूर्ण गावातील नाल्या सफाई चे काम ग्रामपंचायातने सुरू केले आहे.
सध्यास्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव व संचारबंदी असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही.अशा स्थितीत हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते.
त्याचीच दखल घेत वढोलीतील ५० मजुरांना नाली साफ करण्याचे काम उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामपंचायत वढोलीचे सरपंच राजेश कवठे,ग्रामसेवक विनोद झिले व ग्रामपंचायत कमिटीचे मजुरांनी धन्यवाद मानून काम मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here