डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे राज्यात पहिला मृत्यू

0
516

डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे राज्यात पहिला मृत्यू!

 

 

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी
  गुरूबचनसिंग जुनी

यवतमाळ :  नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे राज्यात पहिला मृत्यूची नोंद (Maharashtra Delta Plus Death) झाली आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ८० वर्षांची असून त्यांनी अजूनही बरेच आजार होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सध्या आहे तशीच परिस्थिती राहिल्यास डेल्टा अधिक गंभीर होऊ शकतो. असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. तसेच जगभरातील कोरोना लसींपैकी जवळजवळ सर्वच लसी या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक दिसत नाहीय. यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील चिंतेत काहीसा भर पडला आहे. राज्यात एकूण २१ रुग्णामध्ये ‘डेल्टा-प्लस’ (Delta Plus Variant) हा विषाणू आढळून आला आहे. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here