कर्जत येथे भोले बालाजी फाउंडेशन व परिवार तर्फे आयोजित “कोरोना योद्धा सन्मान” सत्कार सोहळा मान्यवरांचे हस्ते पार पडला
मुंबई प्रतिनिधी : महेश कदम

संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश भगवान कोलेकर, उपाध्यक्ष सौ. आशा निलेश कोलेकर व खजिनदार सूर्यकांत भोईर यांच्या भोले बालाजी फाउंडेशन व परिवार आयोजित कोरोना योद्धा सन्मान सत्कार सोहळा कर्जत येथे संपन्न झाला.
भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना महामारीच संकट सुरु असताना आपल्या महाराष्ट्रातील विविध स्तरातील योद्धा अगदी जिद्दीने व धैर्याने कर्तव्य निभावत आहेत, अशा कर्तव्यदक्ष योद्धा यांच मनोबल वाढावं व त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने आपलं कर्तव्य पार पाडावे म्हणून त्यांचा गौरव करून त्यांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम भोले बालाजी फाउंडेशन व परिवार तर्फे केबीके नगर शेलू, तालुका: कर्जत येथे करण्यात आले.
ज्या व्यक्तींनी या कोरोना काळात कर्तव्य निभावले त्या व्यक्तींच्या कार्याला एक नवीन ऊर्जा मिळावी व त्यांचं मनोधैर्य वाढावं हाच एक उद्देश ठेऊन हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच सदर सोहळ्याला कर्जत चे आमदार माननीय श्री. महेन्द्र शेठ सदाशिवराव थोरवे व विविध क्षेत्रातील नामांकित अधिकारी देखील उपस्थित होते.
यामध्ये, कामा हॉस्पिटल, जे जे हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, जी.टी. हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल,नेरळ ग्रामीण रुग्णालय, कर्जत ग्रामीण रुग्णालय, नेरळ पोलीस, पुणे पोलीस, मुंबई पोलीस व रायगड पोलीस, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर सर्व स्तरावर काम करणारे सुरक्षा रक्षक, पत्रकार व बृहन्मुंबई महानगर पालिका मधील कर्मचारी, सफाई कर्मचारी वर्ग यांना भोले बालाजी फाउंडेशन व परिवार यांच्या विद्यमाने सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला, कर्जत पंचायत समिती सभापती, सुजाताताई मनवे, पंचायत समिती सदस्य नरेश मसने, पोलीस पाटील मनोज पाटील, कामा रुग्णालय चंद्रकांत कदम, बाबाराम कदम, म.आ. पोद्दार रुग्णालय, वरळी प्रशासकीय अधिकारी श्री. नरसु रामचंद्र पाटील, राजाराम कदम, नेरळ ग्रामीण रुग्णालय, श्री. सागर काटे, संदीप बाळसराफ, तसेच कर्जत ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. सुप्रिया घोसाळकर, डॉ जयश्री म्हात्रे, जे जे रुग्णालय राजेंद्र जाधव, बॉम्बे हॉस्पिटल मनोज कदम, जी टी हॉस्पिटल विलास म्हामुणकर, यांची उपस्थिती लाभली, या सर्व कोविड योद्धांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी केबीके नगर उत्सव कमिटी चे श्री. राजाराम मुरुडेकर, विकास खेर, संतोष झरेकर, महादेव आरबोळे, रवी वारके, सचिन वागडे, अंकुश जाधव, संतोष साळुंके, दीपक डांगरे, रोहन भोईर, राम पोटे, संदीप शिंदे, संजय शिंदे, साळुंके साहेब, सचिन चव्हाण, गोपी शेठ, गणेश आलड, सिदेस गावकर, किरण उतेकर, सुंदर धुमाळ, अर्णव मानजी, सुमित सूर्वे व सर्व सदस्य, महिला बचत गट यांनी विशेष प्रयत्न केले.
तसेच कोरोना विषयी जनजागृती म्हणून नटराज डान्स अकॅडमी श्री शंकर पोटे सर यांनी एक उत्कृष्ट असे पथनाट्य सादर केले. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्र संचालन श्री. मनोहर कदम साहेब यांनी केले. तसेच आयोजक श्री. निलेश कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार सोहळा संपन्न झाला.